पोस्ट्स

हातभट्टी भाग २

इमेज
                       इमेज: सर्वेश              अवैध मद्याचे दळणवळण राज्यांच्या सीमांवरून मोठ्या प्रमाणात केले जाते. जंगले किंवा मनुष्य वस्ती कमी असणाऱ्या भागांमध्ये हातभट्ट्या मोठ्या प्रमाणावर आढळतात. हातभट्ट्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने दारू बनवली जाते.                    यामध्ये अनेकदा आदिवासी वस्त्यांमधील लोक दारूभट्टी मधून दारू बनवताना दिसतात. अवैज्ञानिकपणे अनेक गोष्टींकडे लक्ष न दिल्याने जाणतेपणीे किंवा अजाणतेपणी विषबाधा झाल्याच्या घटना घडतात.                   या उद्योगांमध्येही इतर अवैध उद्योगांप्रमाणे माफिया निर्माण झाला आहे. राजकारणी, पोलीस, उद्योग व्यावसायिक, गुन्हेगार, गरीब आणि श्रमिक लोक इ यात सहभागी आहेत. राज्यांमधून इतर राज्यात अवैध दारूची वाहतूक, विक्री होताना त्यामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात लाच घेतात.                    अनेक राजकीय लोक...

हातभट्टी भाग १

इमेज
                                                 इमेज : सर्वेश                २९ जुलै २०२० ची घटना. अमृतसर, गुरुदासपूर आणि तर्न तरन जिल्ह्यांमध्ये अवैध दारूमधून विषबाधा झाल्यामुळे १२१ जणांना जीव गमवावा लागला. (७ ऑगस्ट पर्यंतचा आकडा. हा आकडा वाढू शकतो.) १०० हुन अधिक छापे घातले गेले आणि ५४ जणांना (८ ऑगस्ट पर्यंत) अटक केली गेली.                 पंजाब मधील प्रेस आणि टीव्ही मीडिया वर ही फ्रंट न्युज आणि मेन हेडलाईन असेल. आपल्यासाठी मात्र आतील पानांवरील सर्वसाधारण बातमी. ज्या बातमीला हेडलाईन बघूनच सोडून दिलं जातं. कारण बातम्यांमध्ये यातील राजकारण मिर्चमसाला घालून दाखवलं जातं. आणि विसरलं ही जातं.                मात्र 'नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो' च्या डेटा नुसार भारतात दरवर्षी जवळपास १००० लोकांना दारूतून विषबाधा झाल्याने आपला जीव गमवावा लागतो. त्य...

Opinion: राष्ट्रभक्ती

इमेज
Cartoon via: www.otherwords.org Image by : Sarvesh    राष्ट्रभक्ती. अत्यंत वजनदार आणि दिमाखदार वाटणारा शब्द. शिवाय आपल्या राजकारण्यांचा अत्यंत आवडीचा आणि सर्वाधिक वेळा त्यांच्याकडून भाषणांत, निवडणूक प्रचारात वापरला जाणारा शब्द. शिवाय ज्या शब्दावर जनता 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' खायला तयार होते, तो हा शब्द. त्यामुळे या संज्ञेबद्दल जाणून घेणं औत्सुक्याचे ठरेल.    आता यात दोन शब्द आहेत. राष्ट्र आणि 'भक्ती'. भक्ती अवतरण शब्दात देण्याचं काही विशेष कारण आहे. भक्ती आणि विश्वास या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. वरवर पाहता विश्वास हा त्या गोष्टींवर असतो ज्या गोष्टी सिद्ध झालेल्या असतात. आणि भक्ती त्या गोष्टींवर असते ज्या गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत, मात्र तरीही 'मानसिक' समजूत म्हणून मानणे.या केसमध्ये वास्तववादी गोष्टींवर ठेवला जाणारा तो विश्वास. म्हणजे छाननी करून. आणि या केसमध्ये भक्ती ही वास्तवाचं भान न ठेवता आभासी वातावरणात जगणे असा होईल.      म्हणजे राष्ट्रभक्ती ही ते आभासी जगणं आहे ज्यात आपल्या राष्ट्राच्या प्रतीकांचा गर्व बाळगून 'आम्हीच श्रेष्ठ' आणि...

Explained:- Article 370 (Legal)

इमेज
Image by:- Sarvesh    'Article 370' राज्यसभेत आणि लोकसभेतही निष्प्रभ केलं गेलं. जम्मू आणि काश्मीर ला जे 'स्पेशल स्टेटस' होतं, ते सध्या खूप चर्चेत आहे. मात्र काय होतं हे 'स्पेशल स्टेटस?' पेलेट गन्स, वर्षानुवर्षे असलेलं लष्कर, की दहशतवाद? आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या 370 निष्प्रभ केल्यावरही चालूच राहणार आहेत, याबाबत कोणाचंही दुमत नसावं. त्यातील कायदेशीर पैलू जाणून घेऊ.    'Article 370' च्या अनुसार, फक्त संविधानातील 'कलम 1' आणि 'कलम 370' सोडल्यास सर्व कलमे J & K मध्ये मंजूर करावयाची असल्यास तिथल्या विधानसभेची मंजुरी आवश्यक होती. शहांनी जे दोन बाँम्ब राज्यसभेत आणि लोकसभेत टाकले, ते म्हणजे :-    1) सरकारने 'Article 370' ला राष्ट्रपतींच्या संमतीने निष्प्रभ करायचे ठरवले आहे. सर्व संविधान J & K मध्ये लागू होईल.    2) जम्मू आणि काश्मीर यापुढे राज्य राहणार नाही. J & K विधानसभा असलेलं केंद्रशासित प्रदेश बनेल आणि लडाख विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश बनेल.     मात्र हे सर्व कायदेशीर आहे? पाहुयात या ब्लॉगच्या म...

UAPA : Explained

इमेज
Cartoon by : Sandeep Adhwaryu (TOI) Image by: Sarvesh                                        UAPA. सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला शॉर्ट फॉर्म. Unlawful Activities (Prevention) Act. या कायद्यात नुकतीच दुरुस्ती केली गेली आणि ती दुरुस्ती लोकसभेत प्रचंड बहुमताने आणि राज्यसभेतही मंजूर झाली.         खरं तर हा कायदा 1967 चा. 30 डिसेंबर 1967 रोजी हा कायदा संमत झाला. त्यामध्ये 1969, 1972, 1986, 2004 , 2008 आणि आता म्हणजे 2019 मध्ये दुरुस्ती केली गेली. मग याची एवढी चर्चा करायची गरज काय आहे? आहे. ही दुरुस्ती चर्चा करावी अशीच आहे. आणि 'खतरनाक' सुद्धा आहे. का? पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला समजेल.           या कायद्यामध्ये पूर्वी असणाऱ्या तरतुदी म्हणजे      1) सरकार कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करू शकते.      2) बेकायदेशीर कृत्यांना जाहीर करु शकते आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करु शकते.   ...

इराण आणि त्याचे धर्मराज्य

इमेज
                               Image credits:- Sarvesh                           भारतामध्ये धर्माच्या आधारावर राष्ट्रनिर्मिती करण्याचा विचार राजकीय क्षितिजावर उदयास येत आहे. त्यामुळे धार्मिक विचारधारेचा देशाच्या व्यवस्थेवर होणारा परिणाम पाहणे क्रमप्राप्त आहे. धार्मिक विचारधारेच्या आधारे चालणार्‍या देशांमध्ये होणार्‍या परिणामांचा आढावा आपण खालील मुद्द्यांच्या आधारे करूया. आपण इराण या देशाचा आढावा घेऊयात. 1] स्वातंत्र्य/ सत्तापद्धती बदल :-                     इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ची स्थापना १९७९ रोजी इराणीयन क्रांतीने झाली. त्यापूर्वी १९२५ ते १९७९ पहलवी घराण्याची सत्ता होती. ज्यामध्ये रेझा शाह पहलवी यांची सत्ता १९४१ पर्यंत होती. ती सत्ता अँग्लो-सोवियत आक्रमणांनंतर त्यांना पदत्याग करून सोडावी लागली. त्यानंतर त्यांचे पुत्र मोहम्मद रेझा शाह पहलवी यांनी...

धर्म स्वातंत्र्य- पार्ट 2

इमेज
      Image by :- Sarvesh.     सेक्युलॅरिझम. विवादित शब्द. प्रत्येक पार्टी आमचंच सेक्युलॅरिझम खरं असा खुळखुळा वाजवते, हा आमचाच मक्ता आहे असं सांगत असते. या संज्ञेच्या 'व्यक्ती तितक्या व्याख्या' आहेत. पण आजपर्यंत खरं सेक्युलॅरिझम कुठल्याचं पार्टीने सांगितले नाही. तर जाणून घेऊया, संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेला सेक्युलॅरिझम काय आहे ते!      सेक्युलॅरिझमचे मराठीत अर्थपुर्ण भाषांतर करता येत नाही.  निधर्मी, अधर्मी, धर्मातीत, इहलोकवादी, अगदी धर्मनिरपेक्षता हा शब्दही या संज्ञेचा नीट अर्थ स्पष्ट करत नाही.  त्यामुळे या शब्दाच्या भाषांतराच्या भानगडीत न पडता आपण ही संकल्पना समजावून घेण्याकडे लक्ष देऊयात.      भारतात अनेक धर्म आहेत, म्हणून सेक्युलॅरिझमची आवश्यकता आहे, हा समज चुकीचा आहे. जरी भारतात हिंदू हा एकचं धर्म असता, तरीही आज सेक्युलॅरिझम ची जितकी गरज आहे, तितकीचं गरज भासली असती.   कारण सेक्युलॅरिझमचा जन्म दोन धर्मांच्या संघर्षातून होत नाही तर माणसाच्या पारलौकिक आणि ऐहिक या दोन जीवनाच्या संघर्षातून होत असतो....

धर्म स्वातंत्र्य पार्ट : 1

इमेज
                Image By:- Sarvesh Sawakhande.                    भारतीय संविधानामध्ये सध्याच्या घडीला सहा मुलभूत हक्क आहेत. त्यांपैकी  सतत चर्चेच्या झोतात असणारा हक्क म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. याबद्दल अनेक गैरसमज आहेत. तसेच धर्मस्वातंत्र्याचा हक्काच्या नावाने अनेकदा काही चुकीच्या गोष्टीही केल्या जातात ज्या संविधानाच्या मुलभूत ढाच्याच्या विरोधात आहेत. आजकालच्या राजकारणात धर्मालाही विशेष महत्व आले असताना हा धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहेतरी काय हे आपण पाहूया:-          कलम 25 ते 28 हे धार्मिक स्वातंत्र्याबद्दल भाष्य करते. तर ते खालीलप्रमाणे:- कलम 25 :- भारत राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला स्वयंइच्छेने धर्माचे पालन करण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. अपवाद:-लोकव्यवस्था, नैतिकता, परंपरेच्या अनुसार स्त्रियांचा अपमान अशी रूढी परंपरा जशी सती – प्रणाली, नरबळी, दासप्रथा, अस्पृश्यतेच्या आधारावर जातीयता बाळगता येणार नाही, धर्माच्या आधारावर श्रेष्ठत...

मुक्त ती

इमेज
Image Credits :- Sarvesh Sawakhande.                                               साक्षात प्रकट झाल्यासारखं ती माझ्या जवळ येत होती. माझ्या जास्तचं जवळ ती आली. माझ्या हातातलं पुस्तकं बाजूला ठेवत मी तिला विचारलं, "अरे तू इथे कशी काय?" ती म्हणाली,"का? मला इथे येण्यास बंदी आहे का? "तसं नाही अगं, इतका वेळ झालायं... म्हणून! " मी उत्तरलो.      (थोडावेळ थांबून) "आणि तसं पण मुली इतक्या अपरात्री घरातून बाहेर पडत नाहीत म्हणून !" मी माझ्या वाक्यात जोडलं.    "होय रे, बरोबर आहे तुझं.समाजानं चौकट आखली आहे ना, की स्त्रियांनी अपरात्री घरातून बाहेर पडू नये. का? तर  लिंगपिसाट टपून बसलेले असतात ना? आमच्या इंद्रियांवर कब्जा मिळवण्यासाठी! आणि त्यात आम्हीचं परत दोषी ठरतो!"  ती मुक्त पणे बोलत होती.     मी अस्वस्थ झालो! काय बोलावे ते समजेना. मी बाजूला ठेवलेल्या पुस्तकाकडे पाहू लागलो.       " बलात्कारी धुमाकूळ घालतायत, रोज...

History vs Mahatma Gandhi :- Part 3

इमेज
Image credit:- Sarvesh Sawakhande.   आरोप पक्ष :- My lord , भगतसिंग यांना झालेली शिक्षा गांधी रद्द करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही.   एका शूरवीराला 'महात्मा' वाचवू का शकले नाहीत?       जज :-   बहुचर्चित आरोप आहे. बचाव पक्ष, काय तुमची भूमिका यावर?    बचाव पक्ष :- आरोप पक्ष्याचा इतिहास खूपचं कच्चा दिसतोय!       जज :-  ऑर्डर ,ऑर्डर ... व्यक्तिगत आरोप चालणार नाहीत. कोर्टाची सभ्यता पाळा!    बचाव पक्ष :- I regret my lord! मात्र यात खोटं काय आहे? याचं उत्तर तुम्हाला सातवी- आठवीच्या पुस्तकात मिळून जाईल. गांधी- आयर्विन चर्चासत्र 17 फेब्रुवारी ते 5 मार्च 1931 पर्यंत चाललं. तेव्हा 18 फेब्रुवारी पासूनच वेळोवेळी बापुंनी भगतसिंगांच्या फाशीविषयी आयर्विन यांच्याशी चर्चा करुन शिक्षेला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला. आरोप पक्ष :- पण त्याचा फायदा झाला? शिक्षा थांबली? नाही! फाशी तर मिळालीच ना! बचाव पक्ष :- शिक्षा झाली हे खरंय! मात्र हे हि लक्षात घ्या की गांधी-आयर्विन चर्चेपुर्वी तेजबहाद्दूर या कायदेपंडितांनी आयर्विन या...

History vs Mahatma Gandhi :-Part 2

इमेज
                                                          image credits:- सर्वेश सवाखंडे.                           आरोप पक्ष :- आणि गांधींनी पाकिस्तानला 55 कोटी देऊ केले, मुस्लिम देशाचं, पाकिस्तानचं समर्थन केलं. अशा गांधींना गोडसेनी मारलं तर त्यात त्याचं काय चुकलं?   जज :- हं....   बचाव पक्ष :- ओ....तुम्ही हत्येचं समर्थन करुचं कसं शकता? गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न 25 जून 1934 मध्ये केला गेला पुणे येथे. त्यांच्या कारवर बाँब फेकून. त्यावेळी ना पाकिस्तानचा मुद्दा होता, ना 55 कोटींचा. 1944 मध्ये पाचगणीत जवळपास 20 जण बसमधून येऊन गांधीविरोधी घोषणा देऊ लागले. त्यांचा नेता कोण?   आरोप पक्ष: - कोण?   बचाव पक्ष: - नथुराम गोडसे ! नथुराम गांधींवर चाकू घेऊन झपटला, त्यावेळी भिलारे गुरुजी आणि मणिशंकर पुरोहितांनी त्याला पकडून ठेवले. त्याच वर्षी म्हणजे 1944 साली व...