History vs Mahatma Gandhi :-Part 2

                           
                              image credits:- सर्वेश सवाखंडे.
                       
 आरोप पक्ष:- आणि गांधींनी पाकिस्तानला 55 कोटी देऊ केले, मुस्लिम देशाचं, पाकिस्तानचं समर्थन केलं. अशा गांधींना गोडसेनी मारलं तर त्यात त्याचं काय चुकलं?
  जज:- हं....
  बचाव पक्ष:- ओ....तुम्ही हत्येचं समर्थन करुचं कसं शकता? गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न 25 जून 1934 मध्ये केला गेला पुणे येथे. त्यांच्या कारवर बाँब फेकून. त्यावेळी ना पाकिस्तानचा मुद्दा होता, ना 55 कोटींचा. 1944 मध्ये पाचगणीत जवळपास 20 जण बसमधून येऊन गांधीविरोधी घोषणा देऊ लागले. त्यांचा नेता कोण?
 आरोप पक्ष:- कोण?
 बचाव पक्ष:- नथुराम गोडसे ! नथुराम गांधींवर चाकू घेऊन झपटला, त्यावेळी भिलारे गुरुजी आणि मणिशंकर पुरोहितांनी त्याला पकडून ठेवले. त्याच वर्षी म्हणजे 1944 साली वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात नथुराम जवळून चाकू जप्त केला गेला. 29 जून 1946 रोजी मुंबई- पुणे महामार्गाजवळ नरेल येथे एक मोठा दगड ठेऊन गांधीना मारण्याचा प्रयत्न केला गेला. गांधींनी जेव्हा 125 वर्षे जगण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा नथुरामने 'अग्रणी' मध्ये लेख लिहीला. सांगा पाहू त्याचं शीर्षक काय होतं?
  आरोप पक्ष:- काय?
  बचाव पक्ष:- 'पण जगून कोण देईल?' . या सर्व घटनांमध्ये एक साम्य आहे.
  आरोप पक्ष:- कोणतं?
   बचाव पक्ष:- या घटना 55 कोटी किंवा फाळणीची प्रशासकीय घटना घडण्याच्या आधीच्या आहेत.
  जज:- हं.... तुम्ही तुमचा पक्ष अगदी मजबूतीने मांडलाय.
 आरोप पक्ष:- गांधीच्या अतिअहिंसेमुळे भारताला मिळणारं स्वातंत्र्य 30 वर्षे उशिरा मिळालं. जर सशस्त्र आंदोलन केलं असतं तर हेचं स्वातंत्र्य खुप लवकर मिळालं असतं.
 जज:- आरोप पक्षाच्या बोलण्यात तथ्य आहे. तुमचं मत बचाव पक्ष?
  बचाव पक्ष:- चूक. कोणताही स्वातंत्र्यलढा कधीच सशस्त्रपणे लवकर जिंकला गेला नाही. सशस्त्र लढ्यात दोन्हीकडचे लोक मारले गेले. भारताचा स्वातंत्र्यलढा जगातील उत्कृष्ट स्वातंत्र्यलढ्यांपैकी एक आहे. अहिंसक स्वातंत्र्यलढ्यामुळे सर्व भारत जात, धर्म ,प्रांत यांचे भेद सोडून एकत्र आला आणि अहिंसकपणे ब्रिटीशांच्या लाठ्याकाठ्या खाऊनही अभेद्य उभा राहीला. नेल्सन मंडेला व अनेक आशियाई देशांनी गांधीपासून प्रेरणा घेऊन आपले स्वातंत्र्यलढे यशस्वी केले. अनेक देशात हिंसक लढ्यांनी प्रचंड घातपात घडवला. पहिल्या महायुद्धानंतर सशस्त्र किंवा हिंसक मार्गाने जाणे चुकीचेच होते. हिंसक मार्ग काय करु शकतो हे संपूर्ण जगाने बघितले होते.
 जज:- अहिंसा हे महत्वाचे तत्व आहे. नेल्सन मंडेला व मार्टीन ल्युथर किंग(ज्युनिअर) यांनी गांधींपासून प्रेरणा घेतली हेही तितकेच खरे आहे.
                                                                                                           -(क्रमशः)
                                        लेखन , रिसर्च , analysis ,top image, series idea, संवाद:-  सर्वेश सवाखंडे
                                                                                       शब्दांकन, टायपिंग:- श्रेयस सवाखंडे
   

टिप्पण्या

Trending

आयुष्य

वैज्ञानिक दृष्टिकोन

मुक्त ती