पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धर्म स्वातंत्र्य- पार्ट 2

इमेज
      Image by :- Sarvesh.     सेक्युलॅरिझम. विवादित शब्द. प्रत्येक पार्टी आमचंच सेक्युलॅरिझम खरं असा खुळखुळा वाजवते, हा आमचाच मक्ता आहे असं सांगत असते. या संज्ञेच्या 'व्यक्ती तितक्या व्याख्या' आहेत. पण आजपर्यंत खरं सेक्युलॅरिझम कुठल्याचं पार्टीने सांगितले नाही. तर जाणून घेऊया, संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेला सेक्युलॅरिझम काय आहे ते!      सेक्युलॅरिझमचे मराठीत अर्थपुर्ण भाषांतर करता येत नाही.  निधर्मी, अधर्मी, धर्मातीत, इहलोकवादी, अगदी धर्मनिरपेक्षता हा शब्दही या संज्ञेचा नीट अर्थ स्पष्ट करत नाही.  त्यामुळे या शब्दाच्या भाषांतराच्या भानगडीत न पडता आपण ही संकल्पना समजावून घेण्याकडे लक्ष देऊयात.      भारतात अनेक धर्म आहेत, म्हणून सेक्युलॅरिझमची आवश्यकता आहे, हा समज चुकीचा आहे. जरी भारतात हिंदू हा एकचं धर्म असता, तरीही आज सेक्युलॅरिझम ची जितकी गरज आहे, तितकीचं गरज भासली असती.   कारण सेक्युलॅरिझमचा जन्म दोन धर्मांच्या संघर्षातून होत नाही तर माणसाच्या पारलौकिक आणि ऐहिक या दोन जीवनाच्या संघर्षातून होत असतो....