पोस्ट्स

बंदी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बॅन बॅन

इमेज
  (इमेज: सर्वेश) (Credits: Taandav: IMDb, Agrima Joshua: ndtv, Munawar Faruqui: Bar and Bench, Tanishq ad: she the people, Padmavat: IMDb, My Name Is Khan: IMDb)                  हल्ली भावना दुखावल्या गेल्यामुळे गोष्टी 'बॅन' करायची जणू फॅशनच आली आहे. कुठेतरी एखाद्या चित्रपट, वेब सिरीज, पुस्तक, कलाकृती, स्टँड-अप कॉमेडी, सटायर, जाहिराती मुळे धर्माच्या, राजकीय नेत्यांच्या, ऐतिहासिक व्यक्तींच्या, जातींच्या, परंपरांच्या बद्दल काही टिप्पणी किंवा काही लोकांना प्रतिकूल अशा गोष्टी आढळल्या (किंवा आता आढळल्या नाही तरीही) लोकांच्या भावना दुखावल्या जातात. आजकाल तर याची तीव्रता भयावह वाटावी इतकी वाढली आहे.          नजीकच्या काळात अशा घटना जणू रोजच्याच झाल्यात. उदा.तांडव या वेब सिरीज वर बंदी घालण्याची भाजपा नेते राम कदम यांची मागणी, इंदोर मधील भाजपा नेत्या मालिनी गौड यांचा मुलगा एकलव्य गौड याने शो मध्ये घुसून स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुकी, नवीन यादव, प्रखर व्यास, प्रियम व्यास, एडविन अँथनी, सदाकत खान यांना मारहाण करून पोल...