वैज्ञानिक दृष्टिकोन
आ पण सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द सतत ऐकत असतो.मात्र त्याचा नेमका अर्थ आपल्याला उमगत नाही.वैज्ञानिक दृष्टिकोन हे तर्कनिष्ठ विचारांचा अवलंब करुन नैसर्गिक घटनांच्या आविष्काराचे कारण शोधण्याचे कार्य होय.निसर्ग नियमनाचे तत्व जाणून घेण्यासाठी कुतूहलाने केलेली चिकित्सा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा होय.म्हणूनच हे वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व लक्षात घेऊन भारतीय संविधानाच्या part 4A,article 51 A मध्ये 8 व्या क्रमांकाचे कर्तव्य म्हणून शास्त्रीय दृष्टीकोन ,मानवता व अभ्यासूवृत्ती यांची वाढ करणे या कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांतून मात्र आपण अत्यंत अवैज्ञानिक आहोत हेच प्रतित होते. रस्त्यावरुन चालताना अनेक ठिकाणी [विशेष करुन चौक, तिठा(का ते ठाऊक नाही)] येथे लिंबू, हळद, कुंकू, नारळ, भात,इ.. गोष्टी उतारा म...