महात्मा गांधी आणि हिंदुत्ववाद
(Image: Sarvesh) (credits: Mahatma Gandhi- wikipedia, V.D. Savarkar- counter view) आज ३० जानेवारी. महात्मा गांधींचा पुण्यदिन. महात्मा गांधींची हत्या आणि हत्या करणाऱ्या व्यक्तींच्या विचारसरणी यांबद्दल खूप गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. महात्मा गांधींच्या खुनानंतर महात्मा गांधी यांच्या खुनाचे समर्थन करणाऱ्या अनेक पुस्तकांत महात्मा गांधींची प्रतिमा धर्मद्रोही अशी केली आहे. गांधींच्या हत्येच्या कारणांपैकी खूप मोठे कारण धर्मद्रोह आहे असा आरोप केला जातो. त्यामुळे दोन्ही बाजू समजावून घेणे गरजेचे आहे. * हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्म एकच आहे का? १९२१ किंवा १९२२ मध्ये अंदमानात वि. दा. सावरकर लिखित 'इसेन्शिअल्स ऑफ हिंदुत्व' या पुस्तकामध्ये असं नमूद केलेले आहे की "हिंदू धर्म हा हिंदुत्वाचा एक लहानसा भाग आहे. हिंदुत्ववाद हा हिंदू कुळातील सर्व विचार आणि क्रियाकर्म मिळून बनला आहे. हिंदू धर्म हा फक्त आध्यात्मिक किंवा धार्मिक मतप्रवाहावर आधारित सिद्धांत आह...