पोस्ट्स

Opinion लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Opinion: राष्ट्रभक्ती

इमेज
Cartoon via: www.otherwords.org Image by : Sarvesh    राष्ट्रभक्ती. अत्यंत वजनदार आणि दिमाखदार वाटणारा शब्द. शिवाय आपल्या राजकारण्यांचा अत्यंत आवडीचा आणि सर्वाधिक वेळा त्यांच्याकडून भाषणांत, निवडणूक प्रचारात वापरला जाणारा शब्द. शिवाय ज्या शब्दावर जनता 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' खायला तयार होते, तो हा शब्द. त्यामुळे या संज्ञेबद्दल जाणून घेणं औत्सुक्याचे ठरेल.    आता यात दोन शब्द आहेत. राष्ट्र आणि 'भक्ती'. भक्ती अवतरण शब्दात देण्याचं काही विशेष कारण आहे. भक्ती आणि विश्वास या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. वरवर पाहता विश्वास हा त्या गोष्टींवर असतो ज्या गोष्टी सिद्ध झालेल्या असतात. आणि भक्ती त्या गोष्टींवर असते ज्या गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत, मात्र तरीही 'मानसिक' समजूत म्हणून मानणे.या केसमध्ये वास्तववादी गोष्टींवर ठेवला जाणारा तो विश्वास. म्हणजे छाननी करून. आणि या केसमध्ये भक्ती ही वास्तवाचं भान न ठेवता आभासी वातावरणात जगणे असा होईल.      म्हणजे राष्ट्रभक्ती ही ते आभासी जगणं आहे ज्यात आपल्या राष्ट्राच्या प्रतीकांचा गर्व बाळगून 'आम्हीच श्रेष्ठ' आणि...