धर्म स्वातंत्र्य पार्ट : 1
Image By:- Sarvesh Sawakhande. भारतीय संविधानामध्ये सध्याच्या घडीला सहा मुलभूत हक्क आहेत. त्यांपैकी सतत चर्चेच्या झोतात असणारा हक्क म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. याबद्दल अनेक गैरसमज आहेत. तसेच धर्मस्वातंत्र्याचा हक्काच्या नावाने अनेकदा काही चुकीच्या गोष्टीही केल्या जातात ज्या संविधानाच्या मुलभूत ढाच्याच्या विरोधात आहेत. आजकालच्या राजकारणात धर्मालाही विशेष महत्व आले असताना हा धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहेतरी काय हे आपण पाहूया:- कलम 25 ते 28 हे धार्मिक स्वातंत्र्याबद्दल भाष्य करते. तर ते खालीलप्रमाणे:- कलम 25 :- भारत राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला स्वयंइच्छेने धर्माचे पालन करण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. अपवाद:-लोकव्यवस्था, नैतिकता, परंपरेच्या अनुसार स्त्रियांचा अपमान अशी रूढी परंपरा जशी सती – प्रणाली, नरबळी, दासप्रथा, अस्पृश्यतेच्या आधारावर जातीयता बाळगता येणार नाही, धर्माच्या आधारावर श्रेष्ठत...