पोस्ट्स

कॉर्पोरेट कंपनी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेतकरी जात्यात ,आपण सुपात, अदानी- अंबानी तुपात

इमेज
  शेतकऱ्यांनी तीन कृषी बिलांविरोधात दिल्लीकडे कूच केली. (Credits: NEWSCLICK)                    गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब-हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विषयक कायद्याला विरोध करत आहेत. दोन अडीच महिने झाले शेतकरी आम्हाला हे नवे कायदे नको आहेत असे ओरडून सांगत होते. परंतु शेतकऱ्यांचा हा आवाज ना सरकारपर्यंत पोहोचत होता, ना सरकार पुरस्कृत मीडिया पर्यंत पोहोचत होता. ज्यावेळी या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली तेंव्हा मात्र सरकारच्या आणि गोदी मीडियाच्या कानठळ्या बसायला लागल्या आणि सरकार खडबडून जागे झाले. न्यूज चॅनेल मधून गेले पाच दिवस झाले आपल्याला शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी बातम्या दिसू लागल्या खऱ्या परंतु हे आंदोलन काही काल परवा सुरू झालेले नाही. गेले शंभर दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे.                         5 जून 2020 रोजी मोदी सरकारने कृषी बाजार सुधाराचे अध्यादेश काढले होते. हे अध्यादेश काढताना लोकसभेत कुठलीही चर्चा न...