पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

VK, MPL & UNICORN

इमेज
  Image: Sarvesh               काही दिवसांपूर्वी मोठी बातमी समोर आली. मोबाईल प्रीमियर लीग या विराट कोहलीने गुंतवणूक केलेल्या मोबाईल गेमिंग प्लॅटफॉर्मने ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर  (६.९ अब्ज भारतीय रुपये) इतका निधी उभा केला आणि युनिकॉर्न कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवण्याच्या जवळ आगेकूच केली.               उद्योगजगतात १ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त मूल्य असणाऱ्या खासगी स्टार्टअप कंपन्यांना 'युनिकॉर्न' कंपनी असं म्हणलं जातं. ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा निधी उभा केल्यावर एम पी एल चे एकत्रित मूल्य ९४५ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढं झालं आहे.                एम पी एल ने हा निधी 'सिरीज डी राऊंड फंडिंग' मधून 'कंपोझिट कॅपिटल आणि मुर स्ट्रॅटेजीक वेंचर्स ' आणि 'बेस पार्टनर्स', 'आर टी पी ग्लोबल', 'एस आय जी', 'गो वेंचर्स', 'टेल्स्ट्रा वेंचर्स', 'फाऊंडर्स सर्कल' आणि 'प्ले वेंचर्स' च्या सहभागातून उभा केला आहे. MPL ad / Credits: (wealth mann)            ...