VK, MPL & UNICORN
![]() |
| Image: Sarvesh |
काही दिवसांपूर्वी मोठी बातमी समोर आली. मोबाईल प्रीमियर लीग या विराट कोहलीने गुंतवणूक केलेल्या मोबाईल गेमिंग प्लॅटफॉर्मने ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर (६.९ अब्ज भारतीय रुपये) इतका निधी उभा केला आणि युनिकॉर्न कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवण्याच्या जवळ आगेकूच केली.
उद्योगजगतात १ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त मूल्य असणाऱ्या खासगी स्टार्टअप कंपन्यांना 'युनिकॉर्न' कंपनी असं म्हणलं जातं. ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा निधी उभा केल्यावर एम पी एल चे एकत्रित मूल्य ९४५ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढं झालं आहे.
एम पी एल ने हा निधी 'सिरीज डी राऊंड फंडिंग' मधून 'कंपोझिट कॅपिटल आणि मुर स्ट्रॅटेजीक वेंचर्स ' आणि 'बेस पार्टनर्स', 'आर टी पी ग्लोबल', 'एस आय जी', 'गो वेंचर्स', 'टेल्स्ट्रा वेंचर्स', 'फाऊंडर्स सर्कल' आणि 'प्ले वेंचर्स' च्या सहभागातून उभा केला आहे.
![]() |
| MPL ad / Credits: (wealth mann) |
ही वाढ एम पी एल ने आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतः ला सुरक्षित करण्यासाठी ९० दशलक्ष अमेरिकन डॉलर गुंतवल्यानंतरच्या ५ महिन्यांत दिसून आली. २०१८ मध्ये एम पी एल निर्माण केल्यानंतर कंपनीने एकूण २२५.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढे एकूण भांडवल उभे केले.
एम पी एल ची मूळ कंपनी बंगळुरू स्थित गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आहे, जी एप्रिल २०१८ मध्ये सिंगापूर मध्ये निर्माण झालेल्या एम-लीग पी टी इ लिमिटेड या कंपनीची सहाय्यक कंपनी आहे. एम पी एल सट्टेबाजी च्या नियमांच्या वादात अडकल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचा किट स्पॉन्सर आणि मर्चंडाईज पार्टनर झाल्या नंतर 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' च्या वादाच्या भोवऱ्यात सापडले.
याची अनेक कारणे आहेत. विराट कोहलीला गॅलॅक्टस फन वेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (एम पी एल ची मूळ कंपनी) ने ३३.३२ लाख भारतीय रुपयांचे कंपल्सरी कंवर्टिबल डिबेन्चर्स (सी सी डी) देऊ केले. १७ नोव्हेंबर २०२० रोजी बी सी सी आय ने एम पी एल स्पोर्ट्सला भारतीय क्रिकेट टीम चे नवीन किट स्पॉन्सर आणि अधिकृत मर्चंडाईज पार्टनर म्हणून घोषित केले.
![]() |
| MPL Test kit /Credits: (espn Cricinfo) |
तीन वर्षांच्या करारानुसार एम पी एल सीनियर पुरुष, स्त्री आणि अंडर १९ च्या संघांशी करारबद्ध असेल. एम पी एल चा भाग असलेल्या एम पी एल स्पोर्ट्स ला परवानाकृत जर्सी आणि भारतीय संघाचे इतर मर्चंडाईज विकण्याचे अधिकार मिळाले. विराट कोहलीला २०२० च्या जानेवारीमध्ये एम पी एल चा ब्रँड अँबेसेडर बनवले गेले.
विराट कोहलीला ६८ सी सी डी दिले गेले. ज्याची प्रत्येकी १० रुपये फेस व्हॅल्यू होती. प्रत्येक सी सी डी ४८,९९० रुपये इतक्या प्रीमियम किंमतीला दिले गेले. (एकूण किंमत ३३.३२ लाख रुपये). हे सी सी डी इक्विटी शेअर्स मध्ये१: १ या कंव्हर्जन प्रमाणात १० वर्षात रूपांतरित होतील. म्हणजे एक इक्विटी शेअर एक कर्जरोख्यासाठी. डायल्युशन नंतर कोहली कडे एम पी एल कंपनीतील ०.०५१ टक्के भाग भांडवल असेल.
'द इंडियन एक्सप्रेस' च्या रेकॉर्डस् नुसार ५ फेब्रुवारी २०१९ च्या एक्स्ट्राऑर्डीनरी जनरल मीटिंग मध्ये जेव्हा विराट कोहलीला सी सी डी दिले गेले, तेव्हा गॅलॅक्टस कंपनीने अजून १६.६६ लाख रुपये मूल्य असलेले ३४ सी सी डी कॉर्नर स्टोन स्पोर्ट्स एल एल पी. ला देऊ केले. लक्षणीयरीत्या कॉर्नर स्टोनचा सी ई ओ अमित अरुण सजदेह हा कोहलीचा मॅगपी व्हेंचर पार्टनर्स एल एल पी आणि विराट कोहली स्पोर्ट्स एल एल पी या दोन इतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनर आहे.
![]() |
| Sajdeh & Kohli. /(Credits : circle of cricket) |
सजदेह आणि कोहली यांच्या संबंधांच्या तारा अजून जोडल्या गेल्या आहेत. अजून एक फर्म कॉर्नर स्टोन स्पोर्ट अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ज्याचा सजदेह डायरेक्टर आहे, हा फर्म कोहली आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स - के एल राहुल, रिषभ पंत, उमेश यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि शुभमन गिल यांचे कमर्शियल राईट्स सांभाळण्याचे काम करतो.
कोहली आणि कॉर्नर स्टोन ला सी सी डी दिल्याच्या एक महिन्यानंतर २१ मार्च २०१९ रोजी गॅलॅक्टस ने १०० रुपये फेस व्हॅल्यू असणारे आणि प्रत्येकी प्रिमीयम व्हॅल्यू ४८,९०० रुपये असणारे १४,२८५ सी सी डी बेनेट कोलमन अँड कंपनी लिमिटेड (बी सी सी एल म्हणजेच टाइम्स ग्रुप) ला ६९.९९ करोड या मुल्यात देऊ केले. हे सी सी डी १:१ च्या रूपांतरण प्रमाणात (१ इक्विटी शेअर एका सी सी डी ला) १० वर्षानंतर इक्विटी शेअर मध्ये रुपांतरीत होतील.
बी सी सी आय चे संविधान या पद्धतीच्या व्यावसायिक संबंधांना विरोध करते. या कायद्यांमते 'कमर्शियल कॉन्फ्लिक्ट' म्हणजे, "एखादी व्यक्ती तृतीय पक्षाबरोबर समर्थन करार किंवा इतर व्यावसायिक प्रतिबद्धता यामध्ये सहभागी झाल्यामुळे जर त्या व्यक्तीच्या खेळाबद्दलच्या प्राथमिक कटिबद्धतेशी तडजोड होत असेल किंवा खेळाच्या नियमांशी, शुद्धतेशी तडजोड होत असेल तर अशी व्यक्ती शिक्षेस पात्र ठरेल."
![]() |
| (Credits: investipedia) |
विराट कोहलीशी आणि भारतीय क्रिकेट टीम मधील काही खेळाडूंचा एम पी एल शी असलेल्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधांमुळे एम पी एल भारतीय संघाचा किट स्पॉन्सर होणे एम पी एल साठी सहज सोपे झाले. भारतीय टीम चा किट स्पॉन्सर आणि मर्चंडाईज पार्टनर झाल्यामुळे एम पी एल ला प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे.
या सर्व साखळीच्या केंद्रस्थानी विराट कोहली आहे. हा 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' चा मुद्दा फारसा गांभीर्यतेने घेतला गेला नाहीये. भारतीय क्रिकेट मधील हे आर्थिक राजकारण आणि एकाधिकारशाही थोड्या लोकांच्या फायद्याचे आहे मात्र याचा फटका मोठ्या वर्गाला बसणार आहे.
लेखन, इमेज, पेज एडिटिंग: सर्वेश





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा