मुक्त ती
![]() |
| Image Credits :- Sarvesh Sawakhande. |
(थोडावेळ थांबून) "आणि तसं पण मुली इतक्या अपरात्री घरातून बाहेर पडत नाहीत म्हणून !" मी माझ्या वाक्यात जोडलं.
"होय रे, बरोबर आहे तुझं.समाजानं चौकट आखली आहे ना, की स्त्रियांनी अपरात्री घरातून बाहेर पडू नये. का? तर लिंगपिसाट टपून बसलेले असतात ना? आमच्या इंद्रियांवर कब्जा मिळवण्यासाठी! आणि त्यात आम्हीचं परत दोषी ठरतो!" ती मुक्त पणे बोलत होती.
मी अस्वस्थ झालो! काय बोलावे ते समजेना. मी बाजूला ठेवलेल्या पुस्तकाकडे पाहू लागलो.
" बलात्कारी धुमाकूळ घालतायत, रोज बलात्काराच्या घटना कानावर पडतायेत, सतत स्त्रियांना बलात्काराच्या भीतीखाली डांबलं जातं. स्त्रियांचं चरित्र त्यांच्या जननेंद्रियात आहे. बलात्कारी तर शिकारचं करायला बसलेले आहेत. अशी समजूत उराशी बाळगून स्त्रिया आपल्या चारित्र्यावर कलंक लागेल ह्या भीतीने आपलं आयुष्य कसंबसं जगत असतात. " ती पुन्हा बोलू लागली.
माझ्या तोंडातून तरं शब्दचं फुटेना, मी अस्वस्थ झालो होतो. तिचं बोलणं मला निवडुंगाच्या काट्याप्रमाणे अणुकुचीदार भासत होतं.
माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून ती पुढे बोलू लागली. "नाही रे, मी पुरुषांना ना शत्रू मानते, ना त्यांचा द्वेष करते. मी या समाजाच्या लैंगिकतेकडे पाहणाऱ्या नकारात्मक दृष्टीकोनाला चुकीचं मानते आणि त्याचा द्वेष करते. तुला आठवते का 'असिफा व कोपर्डीतील घटना? " " हो...हो " मी मान डोलावली.
"ह्या घटना काय सांगतात?. ज्या मुलींच्या लैंगिक भावना जागृत नाहीत, त्या चिमुकलींवर लिंगपिसाट बलात्कार करतात! किती दुर्दैवी गोष्ट आहे ना? आपली संस्कृती व आपला धर्म अजून हेच सांगतो, की स्त्रियांनी आपला पदर सांभाळून राहावं, विदेशी कपडे घालू नये,अपरात्री घरातून बाहेर पडू नये! आणि अशा गोष्टी बोलून पुन्हा स्त्रियांनाच दोष! त्या चिमुकल्यांनी पण छोटे कपडे घातले म्हणून त्यांच्यावर बलात्कार झाला का? नाही ना?" ती श्वास रोखून रागात बोलत होती.
तिने दीर्घ श्वास घेतला. त्या स्पंदनांत खूप ताकद होती.
''आदिम संस्कृतीत लोक नग्न राहत, त्यांची कामवासना मर्यादित होतीचं ना? मग आपल्या संस्कृतीत, धर्मात इतके कठोर कायदे असून इतके बलात्कार का होतात माहिती आहे तुला?" ती म्हणाली.
मी पेचात पडलो.
" एखादा व्यक्ती बलात्कारी बनण्यामागील अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये लैंगिक भावनेचा निचरा करण्याची सोय नसणे, वेश्यांंकडे जाण्याइतपत पैसा हातात नसणे, लैगिंक उद्दीपण करणारे चित्रपट इ. करणे. " मी उत्तरलो.
"बरोबरंच आहे; याच्याही पुढचं म्हणजे मानवी दृष्टिकोन महत्वाचा आहे . वाढत्या लैंगिक हिंसाचाराच मूळ हे उद्दीपन करणारे चित्रपट,विडिओ,फोटो नव्हे तर कामेच्छाचं प्रचंड प्रमाणात होणार दमन हे आहे.धर्मानं तर सेक्सला अश्लील ठरवलंय... म्हणे लग्नाच्या वेळी चार मंत्र म्हटले, की संभोग करण्यासाठी तयार! मग सर्वकाही पवित्र! लग्नाआधी संभोग करणं म्हणजे पाप.... मानवी जीवनातील अपरिहार्य गोष्ट पाप ठरवणं व त्याबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन, या ही घटना असू शकतातचं ना? संभोगाला अश्लील ठरवलं व ते कितीही पाप आहे असं सांगितलं, तरीही माणसं संभोग करणं टाळणार नाहीतचं , उलटं लैंगिक दमन होईल व अपराधी भावनेने लोक अशी कृत्ये छुप्या पद्धतीनं करतील. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ 'एमिल कुये' आपला 'विपरीत परिणामांचा नियम' सांगताना म्हणतो , 'ज्या गोष्टीपासून आपण स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, नेमकं त्याच गोष्टीवर आपलं सगळं लक्ष केंद्रित होतं.' म्हणजे मुला-मुलींना योग्य व शास्त्रीय लैंगिक शिक्षण जर दिले नाही तर ते अज्ञान कोठून ना कोठून तर मिळणारचं."
"आता तुझ्या समाजातल्या घटनाचं बघ... आम्हा स्त्रियांना या धर्मांनी 'नैतिक-अनैतिक' या क्रुर चौकटीत अडकवून ठेवलंय. आमच्या मुक्तीची बेडी पुरुषप्रधान संस्कृतीच्या हाती आहे.स्त्रिया मानसिक,सामाजिक गुलाम तर आहेतचं. समाज काय म्हणेल?, या विचाराने तर सगळ्यात जास्त स्त्रिया अन्याय,अत्याचार सहन करतात. वर्षानुवर्षे स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला गेला. तू 'स्त्री' चळवळीची पुस्तके वाचतोस , तरीही तुला ही भय आहे की माझ्यावर 'बलात्कार' होईल, मी इतक्या रात्री मुक्त फिरते म्हणून...." ती बोलली. माझं शरीर बर्फासारखं गोठलं. घसा कोरडा पडला.
"नाही, मी मुक्त आहे. लाखो वेदनांवर मात करणारी, माझ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी , मातृत्व निभावणारी ,अन्याय-अत्याचार सहन करणारी, समाजाच्या दृष्टिकोनाला बळी पडणारी, लिंगपीसाट बलात्कारी प्रवृत्तींना बळी पडणारी , धर्मांसाठी स्वतःचे लैंगिक दमन करून घेणारी मी! 'मी... मुक्त मी!"
डोंगर कोसळल्यासारखा झटकन जागा झालो. इकडं-तिकडं पाहिलं, पण ती मुक्त स्त्री कुठे, कुठेचं दिसतं नव्हती. जवळ ठेवलेलं पुस्तकही दिसतं नव्हतं. मला जागे करणारे माझे वडील आणि माझं अंथरून एवढंच समोर दिसत होतं. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं मला माहितं होतं की अद्र निद्रेतील स्वप्नं जास्त करून आठवत नाहीत. मी अस्वस्थ झालो. कोण होती ती?, जी इतक्या निर्भीडपणे आपल्या स्त्रीत्वाबद्दल बोलत होती. समाजातल्या लैंगिकतेकडे पाहण्याच्या नकारात्मक दृष्टिकोणाबद्दल बोलणारी कोण असेल? मला आपल्या स्त्रीत्वाच्या होणाऱ्या वेदना सांगणारी कोण असेल ती...? कोण असेल?
ती अंजली जोशींच्या 'विरंगी मी! विमुक्त मी!' कादंबरीतील 'लैंगिक मुक्ती हा स्त्री मुक्तीचा केंद्र बिंदू' सांगणारी 'बेटी डॉड्सन' तर नसेल ना? किंवा नीलम माणगावेंच्या "निर्भया लढत आहे" पुस्तकातील निर्भया तर नसेल ना? चेहरा आठवत नव्हता. मी चेहरा आठवण्याचा खूप प्रयत्न केला. तिचा चेहरा आठवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण काही केल्या तिचा चेहरा आठवेना.पुन्हा-पुन्हा स्वप्नात येऊन अस्वस्थ करत होती. कितीतरी दिवस तिचा तो चेहरा आठवण्यात निघून गेले. समाजातील परिस्थिती पाहता, ती मला खूप काही सांगून गेली.
मला समजलं की तिचा चेहरा कधीही दिसणार नाही. रूढी,प्रथा, परंपरा, धर्मांनी तिचा चेहरा लुप्त केला आहे. ती निर्भया,ती या व्यवस्थेला बळी पडलेली, ती एक लढाऊ....ती 'ती' आहे जी कधी समाजासमोर आली नाही. ती 'ती' आहे जी मानसिक तणावात स्वतःला घुसमटत घेतं, अन्याय अत्याचार सहन करत जगते आहे ती... मुक्त ती...
लेखन साभार:- पंकज खोत
शब्दांकन, टायपिंग, front image, संपादन :- सर्वेश सवाखंडे
(सदर लेख संवेदनशील आहे. अशा विचारांवर विशेषतः बोललं जात नाही. तरी वाचकांनी संयम बाळगावा. सदर लेख पुर्ण वाचावा व तद्नंतर कॉमेंट्स कराव्यात. सदर लेखावर जरुर विचार करावा.)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा