पोस्ट्स

Rapes of Women लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुक्त ती

इमेज
Image Credits :- Sarvesh Sawakhande.                                               साक्षात प्रकट झाल्यासारखं ती माझ्या जवळ येत होती. माझ्या जास्तचं जवळ ती आली. माझ्या हातातलं पुस्तकं बाजूला ठेवत मी तिला विचारलं, "अरे तू इथे कशी काय?" ती म्हणाली,"का? मला इथे येण्यास बंदी आहे का? "तसं नाही अगं, इतका वेळ झालायं... म्हणून! " मी उत्तरलो.      (थोडावेळ थांबून) "आणि तसं पण मुली इतक्या अपरात्री घरातून बाहेर पडत नाहीत म्हणून !" मी माझ्या वाक्यात जोडलं.    "होय रे, बरोबर आहे तुझं.समाजानं चौकट आखली आहे ना, की स्त्रियांनी अपरात्री घरातून बाहेर पडू नये. का? तर  लिंगपिसाट टपून बसलेले असतात ना? आमच्या इंद्रियांवर कब्जा मिळवण्यासाठी! आणि त्यात आम्हीचं परत दोषी ठरतो!"  ती मुक्त पणे बोलत होती.     मी अस्वस्थ झालो! काय बोलावे ते समजेना. मी बाजूला ठेवलेल्या पुस्तकाकडे पाहू लागलो.       " बलात्कारी धुमाकूळ घालतायत, रोज...