पोस्ट्स

अवैध वाळू उपसा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वाळू माफिया भाग २

इमेज
   इमेज: सर्वेश           अवैध वाळू उत्खननाविरोधात अनेक व्यक्ती महत्वपूर्ण काम करत आहेत. मात्र याची सुरुवात केलीये सुमैरा अब्दुलाली यांनी. ज्यावेळी त्यांनी ही गोष्ट अनेक ठिकाणी पाहिली त्यावेळी त्यांना या लोकांना रंगेहात पकडलं तरचं FIR नोंदवून घेऊ असं पोलिसांनी सांगितलं.          महाड येथे चाललेला अवैध वाळू उपसा जेव्हा त्यांनी पत्रकारांसोबत जाऊन शूट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. ही घटना २००४ ची. त्यांच्या प्रयत्नाने 'UNESCO' ने २०१२ नंतर वाळू उपसा ही गोष्ट पर्यावरणाच्या विरोधी आहे हे जाहीर केलं.          सुमैरा आणि इतर पर्यावरण कार्यकर्त्यांनी खुप मोठ्या प्रमाणावर 'Don't Bury The Issue Of Sand Mining' ही मोहीम राबवली. त्यातून 'डेनिस डेलेस्ट्रॅक' या फ्रेंच डायरेक्टर ने 'सँड वॉर्स' ही फिल्म बनवली. राष्ट्रीय हरित लवादाने त्यानंतर अवैध वाळू उत्खनना विरोधातील कायदे अत्यंत कठोर केले.           अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सुमैरा अब्दुलाली, पर्यावरण कार्...

वाळू माफिया भाग १

इमेज
  इमेज: सर्वेश              वाळू. ही सामान्य वाटणारी गोष्ट सगळीकडे पसरलेली आहे. मोठमोठ्या बिल्डिंग्जच्या काँक्रीटपासून ते स्मार्टफोनच्या काचेपर्यंत वाळू सगळीकडे पसरलेली आहे. वाळूपासून काच बनली आणि काचेने वैज्ञानिक क्रांती घडवली. टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपने विज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे. वाळू मानवाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलाय.      त्यामुळे वाळूला महाप्रचंड मागणी आहे. जगात दरवर्षी सरासरी ४० अब्ज टन वाळू वापरली जाते. ही मागणी दरवर्षी वाढतचं आहे. ज्याने याला दरवर्षी ७० अब्ज अमेरिकी डॉलर्स कमवणारी इंडस्ट्री बनवली आहे. जगातील अनेक देश स्वतःची भौगोलिक सीमा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाळू आयात करत आहेत. ऑस्ट्रेलिया आखाती देशांना प्रचंड मोठ्या जहाजांतून वाळू निर्यात करत आहे. वाळूच्या वापरामध्ये चीनपाठोपाठ भारताचा दुसरा क्रमांक लागतो.          बांधकाम करण्यासाठी विशेषतः नदीतून मिळणारी वाळू  वापरली जाते. तिच्या अभावी समुद्रातील वाळू सुद्धा वापरली जाते. यासाठी वाळवंटातील वाळू वापरता येत...