पोस्ट्स

Amit Shah लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Explained:- Article 370 (Legal)

इमेज
Image by:- Sarvesh    'Article 370' राज्यसभेत आणि लोकसभेतही निष्प्रभ केलं गेलं. जम्मू आणि काश्मीर ला जे 'स्पेशल स्टेटस' होतं, ते सध्या खूप चर्चेत आहे. मात्र काय होतं हे 'स्पेशल स्टेटस?' पेलेट गन्स, वर्षानुवर्षे असलेलं लष्कर, की दहशतवाद? आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या 370 निष्प्रभ केल्यावरही चालूच राहणार आहेत, याबाबत कोणाचंही दुमत नसावं. त्यातील कायदेशीर पैलू जाणून घेऊ.    'Article 370' च्या अनुसार, फक्त संविधानातील 'कलम 1' आणि 'कलम 370' सोडल्यास सर्व कलमे J & K मध्ये मंजूर करावयाची असल्यास तिथल्या विधानसभेची मंजुरी आवश्यक होती. शहांनी जे दोन बाँम्ब राज्यसभेत आणि लोकसभेत टाकले, ते म्हणजे :-    1) सरकारने 'Article 370' ला राष्ट्रपतींच्या संमतीने निष्प्रभ करायचे ठरवले आहे. सर्व संविधान J & K मध्ये लागू होईल.    2) जम्मू आणि काश्मीर यापुढे राज्य राहणार नाही. J & K विधानसभा असलेलं केंद्रशासित प्रदेश बनेल आणि लडाख विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश बनेल.     मात्र हे सर्व कायदेशीर आहे? पाहुयात या ब्लॉगच्या म...

UAPA : Explained

इमेज
Cartoon by : Sandeep Adhwaryu (TOI) Image by: Sarvesh                                        UAPA. सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला शॉर्ट फॉर्म. Unlawful Activities (Prevention) Act. या कायद्यात नुकतीच दुरुस्ती केली गेली आणि ती दुरुस्ती लोकसभेत प्रचंड बहुमताने आणि राज्यसभेतही मंजूर झाली.         खरं तर हा कायदा 1967 चा. 30 डिसेंबर 1967 रोजी हा कायदा संमत झाला. त्यामध्ये 1969, 1972, 1986, 2004 , 2008 आणि आता म्हणजे 2019 मध्ये दुरुस्ती केली गेली. मग याची एवढी चर्चा करायची गरज काय आहे? आहे. ही दुरुस्ती चर्चा करावी अशीच आहे. आणि 'खतरनाक' सुद्धा आहे. का? पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला समजेल.           या कायद्यामध्ये पूर्वी असणाऱ्या तरतुदी म्हणजे      1) सरकार कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करू शकते.      2) बेकायदेशीर कृत्यांना जाहीर करु शकते आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करु शकते.   ...