Explained:- Article 370 (Legal)

Image by:- Sarvesh

   'Article 370' राज्यसभेत आणि लोकसभेतही निष्प्रभ केलं गेलं. जम्मू आणि काश्मीर ला जे 'स्पेशल स्टेटस' होतं, ते सध्या खूप चर्चेत आहे. मात्र काय होतं हे 'स्पेशल स्टेटस?' पेलेट गन्स, वर्षानुवर्षे असलेलं लष्कर, की दहशतवाद? आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या 370 निष्प्रभ केल्यावरही चालूच राहणार आहेत, याबाबत कोणाचंही दुमत नसावं. त्यातील कायदेशीर पैलू जाणून घेऊ.
   'Article 370' च्या अनुसार, फक्त संविधानातील 'कलम 1' आणि 'कलम 370' सोडल्यास सर्व कलमे J & K मध्ये मंजूर करावयाची असल्यास तिथल्या विधानसभेची मंजुरी आवश्यक होती. शहांनी जे दोन बाँम्ब राज्यसभेत आणि लोकसभेत टाकले, ते म्हणजे :-
   1) सरकारने 'Article 370' ला राष्ट्रपतींच्या संमतीने निष्प्रभ करायचे ठरवले आहे. सर्व संविधान J & K मध्ये लागू होईल.
   2) जम्मू आणि काश्मीर यापुढे राज्य राहणार नाही. J & K विधानसभा असलेलं केंद्रशासित प्रदेश बनेल आणि लडाख विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश बनेल.
    मात्र हे सर्व कायदेशीर आहे? पाहुयात या ब्लॉगच्या माध्यमातून!
    याचं वर्णन जम्मू काश्मीर वरील संवैधानिक आकस्मित हल्ला असं करता येईल. का ते पुढं समजेल. 'Article 370' ही ऑक्टोबर 1947 मध्ये भारत सरकारने जम्मू काश्मीर संस्थानाशी तरतूद केली. जम्मू काश्मीर संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होतं. पाकिस्तानने हल्ला केल्यावर संस्थानाने भारताकडे मदत मागितली, जी देण्याच्या बदल्यात सरकारने संस्थानाकडून भारताला जोडून घेण्याचे आश्वासन घेतले. मात्र राजा हरिसिंगनी काही अटी घातल्या आणि ते भारताला जोडून घ्यायला तयार झाले. त्या अर्थी हा जम्मू काश्मीर आणि भारताला जोडणारा एक पूल होता.
              केंद्र सरकारने J & K राज्य सरकार ( विधानसभा) सत्तेत नसताना ( राष्ट्रपती राजवट असताना)
राष्ट्रपतींच्या द्वारे केंद्र सरकारकडे 'Article 370' बद्दलचा म्हणजे राज्याच्या अस्तित्वाबद्दलचा निर्णय राज्याच्या विधानसभेला किंवा तेथील लोकांना विचारात न घेता घेतला गेला याला 'केंद्र सरकारी हुकूमशाही' किंवा संघराज्य पद्धतीवरचा हल्ला म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
           कलम 144 अन्वये त्या राज्यात सैन्य वाढवून आणि पोलिसी ताकदीच्या बळावर तेथील राजकीय नेत्यांना मध्यरात्री 'House arrest' केलं गेलं. राज्यातील इंटरनेट आणि इतर संपर्क सुविधा बंद करण्यात आल्या, लोकांना एकत्र यायला बंदी करण्यात आली, जे नैतिकतेला धरून नाही.
           वर सांगितलेल्या गोष्टींबरोबरच महाराजा हरिसिंग यांनी काही अटी ठेवल्या , ज्या भारत सरकारने मान्य केल्या. त्यानुसार जम्मू काश्मीर भारतावर संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि संप्रेषण या मुद्द्यांवर अवलंबून राहिलं हे मान्य केलं गेलं. भारतातील प्रवेशाच्या तरतुदीतील (Instrument of Accession ) च्या 7 व्या कलमात राजा हरिसिंग म्हणाले होते,
 " Nothing in this instrument shall be deemed to commit me in any way to acceptance of any future Constitution of India or to fetter my discretion to enter into arrangements with the Government of India under any such future Constitution. "
     'Article 370' हे त्यामुळे खूपच जास्त काळजीपूर्वक ड्राफ्ट केलेलं Article होतं. जम्मू आणि काश्मीर संस्थान भारतात विलीन होत असताना तेथील राजा हरिसिंग आणि तेथील लोकांच्या मताला, अटींना आदर देत जम्मू आणि काश्मीरला भारतीय संघराज्यात सामील करून घेण्याचा हा प्रयत्न होता.
     10 भारतीय राज्यांना अशा पद्धतीच्या 'विशेष तरतुदी' लागू आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, आसाम , सिक्कीम, त्रिपुरा. त्यातल्या उत्तराखंड वा हिमाचल वगळता अन्य सर्वच राज्यांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी अनुभवलेली आहे आणि त्यातून हिंसाचार ही झालेला आहे. यातही परत आसाम वगळता अन्य राज्यातील घुसखोरीही इस्लाम धर्मियांशी संबंधित नाही. त्यामुळे यापैकी काही राज्यातील गट जम्मू काश्मीर इतकेच फुटीरतावादी असूनही त्या राज्यांतील अशा चळवळींविषयी आपल्या भावना जम्मू काश्मीर इतक्या तीव्र नाहीत.
     'Article 370' '26 जानेवारी 1950' पासून अंमलात आलं, ज्यामध्ये भारतीय राष्ट्रपतींसाठी काही तरतुदी आल्या ज्या म्हणजे भारतीय संविधानातील काही तरतुदी जम्मू आणि काश्मीरच्या राज्य सरकारच्या संमतीने लागू करता येतील. 'Article 370' अजून सांगतं की, हा कायदा जम्मू आणि काश्मीरच्या संविधान समितीपुढे "अशा निर्णयासाठी ठेवावा लागेल जो तिथे लागू होऊ शकेल" आणि राज्य विधानसभा ही शेवटची 'ऑथोरिटी' असेल जी संविधानातील कोणता भाग राज्यात लागू होईल आणि कोणता होणार नाही हे ठरवेल.
      खूप चर्चिला गेलेला मुद्दा म्हणजे 'Article 370' तात्पुरती तरतूद होती (?) त्यामुळे तो रद्द झाला हे योग्य झालं. हो हे खरं आहे, मात्र हे रद्द करण्याचा अधिकार 'जम्मू आणि काश्मीर संविधान समितीकडे' देण्यात आला होता, मात्र जम्मू आणि काश्मीरच्या संविधान समितीने ते कलम रद्द न करणं निवडलं.
      संविधान तज्ञ 'ए. जी. नुराणी' यांच्या 'Article 370' वरील 'A Constitutional history of Jammu and Kashmir ' पुस्तकात म्हणलंय,
      "The article's provisions are temporary, in that the state government's Authority to give it's concurrence to presidential orders, lasts only till states constituent assembly is convined. "
      "Once the Constitution assembly (of the state) met, the state government could not give it's own 'concurrence'. Still less, after the assembly met and dispersed. Moreover the president can not exercise his power to extend the Indian Constitution to Jammu & Kashmir indefinitely.
      The power has to stop at the point the state's constituent assembly drafted the state's Constitution & decided finally what additional subjects to confer on the Union and what other provisions of the Constitution of India. It should get extended to the state, rather than having their counterparts embodied in the state Constitution itself. Once the state's constituent assembly had finalized the scheme & dispersed, the president's extending powers ended completely."
     ' Article 370' मध्ये दुरुस्तीसाठी तरतूद आहे.
Article 370 (3) - Not withstanding anything in the foregoing provisions of this article, the president may, by public notification , declare that this article shall cease to be operative or shall be operative only with such exceptions & modifications & from such date as he may specify:
Provided that the recommendation of the constituent assembly of the state.... Shall be necessary before the president issues such a notification."
           मात्र यातून बाहेर पडण्यासाठी अमित शहांनी 2 स्टेप प्रोसेस वापरली.
 1. शाहनी असं मत व्यक्त केलं की, राष्ट्रपती आदेशात दुसऱ्या article मध्ये दुरुस्ती करण्याची ताकद आहे.
 'Article 367' आणि त्या आधारे त्यांनी 'जम्मू आणि काश्मीर संविधान समितीची' पुनर्व्याख्या संविधानात समाविष्ट केली की, यापुढे या कायद्यातील 'Constituent Assembly' चा अर्थ 'Legislative Assembly' घेतला जावा. ही असंवैधानिक तरतूद करून (कारण राष्ट्रपती आदेश अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या चालू असलेल्या कायद्यात दुरुस्ती करू शकत नाहीत.)
 2.शाह नंतर म्हणाले, कारण जम्मू आणि काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट आहे, आणि जम्मू आणि काश्मीर केंद्राच्या हातात आहे, त्यामुळे केंद्र सरकारला जम्मू आणि काश्मीरच्या 'legislative assembly' आणि 'constituent assembly' ला 'substitute' म्हणून वापरता येईल कारण जम्मू आणि काश्मीरची 'legislative assembly' विसर्जित झाली आहे.
 हा खरंच एक चित्तथरारक दावा आहे. जम्मू आणि काश्मीर 'constituent assembly' ने 1956 साली जम्मू आणि काश्मीर मध्ये राज्याचं संविधान मंजूर केलं. आणि स्वतःला 26 जानेवारी 1957 ला विसर्जित केलं. संविधान सभेने स्वतःचे कायदे विस्तृतरीत्या स्पष्ट करण्यासाठी स्वतःची भाषा हेतुपरस्पर निवडली.
     24 जानेवारी, 1950 रोजी भारताची संविधान समिती जी शेवटच्या वेळी भेटणार होती, त्यांनी ती मीटिंग अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलली. (पुढच्या मीटिंगची वेळ न ठरवता) मात्र विरोधाभास असा की, जम्मू आणि काश्मीर संविधान समितीने शेवटच्या दिवशी अशी तरतूद केली की,
 "Today this historic session ends & with this the constituent assembly is dissolved according to the resolution passed on 17 th November 1956."
        तो उपाय यासाठी होता की, जम्मू आणि काश्मीरच्या संविधान समितीला विसर्जित करून 'Article 370' च्या 'तात्पुरत्या' स्वरूपाला 'कायमस्वरूपी' करता यावं. कारण संविधान समिती अशी संस्था होती जिच्या सल्ल्यावरून 'article 370' ला निष्प्रभ केलं जाऊ शकत होतं. त्या संस्थेलाचं विसर्जित केलं गेलं. या व्याख्येला 'Constitution bench' कडून 1959 च्या प्रेमनाथ कौल विरुद्ध जम्मू काश्मीर राज्य सरकार केसमध्ये समर्थन दिलं गेलं. सुप्रीम कोर्टच्या काही निर्णयांच्या पाठिंब्याने खेदजनकपणे नंतर नेहरू आणि पुढील सरकारांनी जम्मू आणि काश्मीरच्या 'Autonomy' ला इतकं महत्त्व दिलं नाही.
        पण अलीकडच्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयातून जस्टीस रोहिंतन नरिमन यांनी लिहिलं,
 "Despite the fact that it is... stated to be temporary in nature, sub clause (3) of article 370 makes it clear that this article shall cease to be operative only from such date as the president may by public notification declare. And this cannot be done under the proviso to the article 370 (3) unless there is a recommendation of the constituent assembly of the state so to do."
 त्यामुळे मला असं मुळीचं वाटतं नाही , की अमित शहांचा राष्ट्रपती राजवट असताना त्यांच्या करवी हा कायदा रद्द करण्याचा फॉर्म्युला हा 'Constitutionality' ला धरून आहे.
  जम्मू आणि काश्मीरला केंद्र सरकारच्या प्रभावाखालील केंद्रशासित प्रदेश बनवण्याचं आणि दुभाजक टाकण्याचं कारण काय?
  संविधानातील कलम 3 अन्वये, हे केंद्रशासित प्रदेश करणं आणि दुभाजक करणे याला परवानगी नाही. कलम 3 अन्वये, "संसदेला एखाद्या राज्याचे भूक्षेत्र कमी करायचे असेल किंवा त्या राज्याचे नाव बदलायचं असेल, तर त्यावेळी राष्ट्रपतींनी त्या राज्य सरकारचे त्यावरील मत विचारात घ्यावे, त्यानंतर ते बिल मंजूर केलं जावं."
  हे भारताच्या संघराज्य पद्धतीचे संरक्षण करणारे कायदे आहेत. ज्यांचं अनुकरण या केसमध्ये केलं गेलं नाही, हे 100% खरं आहे.
    एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट असताना त्याचे अधिकार केंद्राकडे येतात आणि त्यामुळे त्या राज्याच्या अस्तित्वाचा निर्णय त्या राज्यातील कोणालाही न विचारता घेणं हे लॉजिकचं किती खतरनाक आहे? विचार करा हिचं परिस्थिती उद्या राष्ट्रपती राजवट येऊन तामिळनाडू, आसाम ,कर्नाटक किंवा एखाद्या इतर राज्यावर आली आणि त्या राज्यांचं अस्तित्व नष्ट करून जर त्यांना केंद्रशासित प्रदेश बनवलं गेलं तर? शाह यांचं काय विचित्र लॉजिक आहे!
     मला हे खुप विचित्र वाटलं की प्रादेशिक पार्ट्या जसं की YSR Congress (आंध्र प्रदेश) ,बिजू जनता दल (उडीसा), शिवसेना (महाराष्ट्र), आम आदमी पार्टी (दिल्ली) यांनी या अशा असंवैधानिक आणि संघराज्य पद्धतीच्या विरोधातील विधेयकाला होकार दर्शवला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हा जो संघराज्य पद्धतीवर आणि जम्मू आणि काश्मीरच्या स्वायतत्तेवर हल्ला केला आहे.
     माझी अशी आशा आहे की सुप्रीम कोर्ट या निर्णयाबाबत सरकारला फटकारेल आणि संवैधानिक मुद्द्यांची आब ठेवेल. शेवटी संविधानामधील कायदे 'राजकीय, धार्मिक' हेतूंपेक्षा महत्त्वाचे आहेत. नाही का? आणि जमीन महत्त्वाची की माणसं?
                                                          -लेखन आणि इमेज:- सर्वेश
 

   
       

टिप्पण्या



  1. कलम ३७० आणि काश्मीरचा प्रश्न

    हे कलम रद्द करणे कायदेशीर दृष्ट्या अतिशय सोपी गोष्ट आहे. एक अध्यादेश काढून राष्ट्रपती हे कलम केव्हाही रद्द करू शकतात. त्यासाठी लोकसभेत घटना दुरुस्तीचे सोपस्कार सुद्धा करण्याची गरज नाही. हे कलम रद्द करण्यासाठी काश्मीरच्या घटना समितीची पूर्व संमती घेण्याची या कलमात असलेली अट आता अर्थशून्य झालेली आहे. कारण आता राज्यात घटना समितीच अस्तित्वात नाही. राज्यघटना तयार झाल्यावर ती बरखास्त झालेली आहे. अशा परिस्थितीत 'घटनासमितीची संमती' याचा कायदेशीर अर्थ 'मृत माणसाची संमती' असा होतो. कायद्याप्रमाणे अशी संमती अर्थशून्य वा गैरलागू ठरते. तेव्हा प्रश्न 370 कलम रद्द करण्यासाठी च्या कायदेशीर अडचणींचा नसून, ते रद्द करण्याच्या इच्छाशक्तीचा आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Wrong. If you want an answer to your question, read complete blog carefully. Points mentioned in your comment are almost false. In above blog all the questions are answered.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Trending

आयुष्य

वैज्ञानिक दृष्टिकोन

मुक्त ती