आयुष्य

इमेज :सर्वेश

         


                   काही लोक भेटून बदलून जातात आणि काही लोकांशी भेटून आयुष्य बदलुन जातं...  काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि खूप साऱ्या आठवणी साठवून जातात. काही लोक आयुष्य घडवतात. आयुष्याची वाट दाखवतात. चांगले विचार देऊन जातात.


         समाजातील बऱ्याच गोष्टीचं भान आपल्याला करून देतात. आयुष्य म्हणजे काय? ते कसं जगायचं ?आयुष्यात नेमकं करायचं तरी काय ? या गोष्टी ते सांगून जातात. आणि आपल्याला त्याची किंमत कळत नाही. वेळ निघून जाते आणि त्या गोष्टीची आठवण करून देते. आणि सरतशेवटी आयुष्याची बेरीज शून्य लागते.

        त्याचप्रमाणे खडतर लोकही असतात आपल्या आयुष्यात. परंतु ती खूप निर्मळ मनाची असतात. नेहमी आपलाच विचार करणारी, ती आपल्याला समजत नाहीत. काही येतात अन् खूप सार दुःखच देऊन जातात. काही रक्ताची असतात पण खूप सारं दुःखच देतात तर काही परके आनंद देतात. तर काही अनुभव देऊन जातात. 

         या सर्व गोष्टींंचं ओझं हलकं करण्यासाठी, आपलं सुख, दुःख सांगण्यासाठी  देवाने मित्र नावाचा प्राणी दिलाय बरका.. आयुष्यात.  -किती सुंदर गोष्टी आहेत या निसर्गामध्ये. आपण कधी त्याकडे बारकाईने पाहतचं नाही. त्या कधी आपण समजून घेतल्याच नाहीत. 

               आणि ज्या कोणी घेतल्या त्यांना आयुष्य कळालं...बरेच लोक देवाकडे भरपूर गोष्टी मागतात. मला हे..दे, मला ते...दे परंतु आपण कधी विचार केलाय का की, या निसर्गामध्येच देवाने सर्व काही दिलेलं आहे. याचं निसर्गात शुद्ध हवा आहे, पाणी आहे. याचं निसर्गात काही गोष्टी पिकवल्या जातात. उगवल्या जातात. 

           माणसाचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून बऱ्याचश्या वनस्पती आहेत. माणसाला आवडतील अशी फळं आहेत. फुलाचा सुगंध आहे.  माणसाने जास्त थकून जाऊ नये. योग्य त्या दिशेची वाट असावी म्हणून दिवसाची सुरूवात आणि दिवसाचा शेवट सुद्धा आहे. 

        अशा पद्धतीने विचार करण्यासारख्या अजून खूप गोष्टी शिल्लक आहेत. तरी पण माणसाला एवढी हाव कशासाठी? एवढं सर्वकाही असताना तरी सुद्धा तो देवाकडे मागतच राहतो. बरं..एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तो आनंदी का राहू शकत नाही? तर या पलीकडे जाऊन लक्षात येत माणसाचं अज्ञान. माणूस किती ज्ञानी आहे. तो किती अहंकारी आहे. तो किती स्वार्थी आहे.

      लेखन : स्मर्णिका संजय डूबल

     (डूबल धुळगाव ) सांगली जिल्हा

     इमेज, पेज एडिटिंग: सर्वेश

टिप्पण्या


  1. खूपच सुंदर ....😊.
    अजुन खुप लेख आणि कविता तुमच्याकडून प्रकाशित व्हाव्या हीच अपेक्षा. .
    पुढील वाटचालीस शुभेच्छा ...💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. तुझ्या पुढच्या लेखाची ,कवितेची आम्ही वाट बघतोय.... पुढील वाटचालीस मनापासून खुप शुभेच्छा��..keep it up��

    उत्तर द्याहटवा

  3. नमस्ते स्मर्णिका जी..
    आपली लेखनी हि गानकोकीळे सारखी आहे,तिच्या आवाजाने जसे सगळे मंत्रमुग्ध होतात तसेच आपला लेख वाचून आम्ही वाचक मंत्रमुग्ध होत आहोत...
    असेच अप्रतिम लिहीत रहा..
    आपणांस मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा..
    👌💐💗

    उत्तर द्याहटवा

  4. या स्वार्थी दूनियेत,तुम्ही एक अस्वार्थी आणि जिवनात कसें खरं जगावे या सगळ्यांची नक्कीच एक दिशा दाखवली ,त्याबद्दली धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  5. Those are facts and very well said
    Keep writing and inspiring us with your thoughts

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Trending

वैज्ञानिक दृष्टिकोन

मुक्त ती