पोस्ट्स

पालेराम चौहान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वाळू माफिया भाग १

इमेज
  इमेज: सर्वेश              वाळू. ही सामान्य वाटणारी गोष्ट सगळीकडे पसरलेली आहे. मोठमोठ्या बिल्डिंग्जच्या काँक्रीटपासून ते स्मार्टफोनच्या काचेपर्यंत वाळू सगळीकडे पसरलेली आहे. वाळूपासून काच बनली आणि काचेने वैज्ञानिक क्रांती घडवली. टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपने विज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे. वाळू मानवाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलाय.      त्यामुळे वाळूला महाप्रचंड मागणी आहे. जगात दरवर्षी सरासरी ४० अब्ज टन वाळू वापरली जाते. ही मागणी दरवर्षी वाढतचं आहे. ज्याने याला दरवर्षी ७० अब्ज अमेरिकी डॉलर्स कमवणारी इंडस्ट्री बनवली आहे. जगातील अनेक देश स्वतःची भौगोलिक सीमा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाळू आयात करत आहेत. ऑस्ट्रेलिया आखाती देशांना प्रचंड मोठ्या जहाजांतून वाळू निर्यात करत आहे. वाळूच्या वापरामध्ये चीनपाठोपाठ भारताचा दुसरा क्रमांक लागतो.          बांधकाम करण्यासाठी विशेषतः नदीतून मिळणारी वाळू  वापरली जाते. तिच्या अभावी समुद्रातील वाळू सुद्धा वापरली जाते. यासाठी वाळवंटातील वाळू वापरता येत...