Explained:- Article 370 (Legal)
Image by:- Sarvesh 'Article 370' राज्यसभेत आणि लोकसभेतही निष्प्रभ केलं गेलं. जम्मू आणि काश्मीर ला जे 'स्पेशल स्टेटस' होतं, ते सध्या खूप चर्चेत आहे. मात्र काय होतं हे 'स्पेशल स्टेटस?' पेलेट गन्स, वर्षानुवर्षे असलेलं लष्कर, की दहशतवाद? आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या 370 निष्प्रभ केल्यावरही चालूच राहणार आहेत, याबाबत कोणाचंही दुमत नसावं. त्यातील कायदेशीर पैलू जाणून घेऊ. 'Article 370' च्या अनुसार, फक्त संविधानातील 'कलम 1' आणि 'कलम 370' सोडल्यास सर्व कलमे J & K मध्ये मंजूर करावयाची असल्यास तिथल्या विधानसभेची मंजुरी आवश्यक होती. शहांनी जे दोन बाँम्ब राज्यसभेत आणि लोकसभेत टाकले, ते म्हणजे :- 1) सरकारने 'Article 370' ला राष्ट्रपतींच्या संमतीने निष्प्रभ करायचे ठरवले आहे. सर्व संविधान J & K मध्ये लागू होईल. 2) जम्मू आणि काश्मीर यापुढे राज्य राहणार नाही. J & K विधानसभा असलेलं केंद्रशासित प्रदेश बनेल आणि लडाख विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश बनेल. मात्र हे सर्व कायदेशीर आहे? पाहुयात या ब्लॉगच्या म...