पोस्ट्स

Liberty of faith and worship लेबलसह पोस्ट दाखवत आहे

धर्म स्वातंत्र्य- पार्ट 2

इमेज
      Image by :- Sarvesh.     सेक्युलॅरिझम. विवादित शब्द. प्रत्येक पार्टी आमचंच सेक्युलॅरिझम खरं असा खुळखुळा वाजवते, हा आमचाच मक्ता आहे असं सांगत असते. या संज्ञेच्या 'व्यक्ती तितक्या व्याख्या' आहेत. पण आजपर्यंत खरं सेक्युलॅरिझम कुठल्याचं पार्टीने सांगितले नाही. तर जाणून घेऊया, संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेला सेक्युलॅरिझम काय आहे ते!      सेक्युलॅरिझमचे मराठीत अर्थपुर्ण भाषांतर करता येत नाही.  निधर्मी, अधर्मी, धर्मातीत, इहलोकवादी, अगदी धर्मनिरपेक्षता हा शब्दही या संज्ञेचा नीट अर्थ स्पष्ट करत नाही.  त्यामुळे या शब्दाच्या भाषांतराच्या भानगडीत न पडता आपण ही संकल्पना समजावून घेण्याकडे लक्ष देऊयात.      भारतात अनेक धर्म आहेत, म्हणून सेक्युलॅरिझमची आवश्यकता आहे, हा समज चुकीचा आहे. जरी भारतात हिंदू हा एकचं धर्म असता, तरीही आज सेक्युलॅरिझम ची जितकी गरज आहे, तितकीचं गरज भासली असती.   कारण सेक्युलॅरिझमचा जन्म दोन धर्मांच्या संघर्षातून होत नाही तर माणसाच्या पारलौकिक आणि ऐहिक या दोन जीवनाच्या संघर्षातून होत असतो....

धर्म स्वातंत्र्य पार्ट : 1

इमेज
                Image By:- Sarvesh Sawakhande.                    भारतीय संविधानामध्ये सध्याच्या घडीला सहा मुलभूत हक्क आहेत. त्यांपैकी  सतत चर्चेच्या झोतात असणारा हक्क म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. याबद्दल अनेक गैरसमज आहेत. तसेच धर्मस्वातंत्र्याचा हक्काच्या नावाने अनेकदा काही चुकीच्या गोष्टीही केल्या जातात ज्या संविधानाच्या मुलभूत ढाच्याच्या विरोधात आहेत. आजकालच्या राजकारणात धर्मालाही विशेष महत्व आले असताना हा धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहेतरी काय हे आपण पाहूया:-          कलम 25 ते 28 हे धार्मिक स्वातंत्र्याबद्दल भाष्य करते. तर ते खालीलप्रमाणे:- कलम 25 :- भारत राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला स्वयंइच्छेने धर्माचे पालन करण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. अपवाद:-लोकव्यवस्था, नैतिकता, परंपरेच्या अनुसार स्त्रियांचा अपमान अशी रूढी परंपरा जशी सती – प्रणाली, नरबळी, दासप्रथा, अस्पृश्यतेच्या आधारावर जातीयता बाळगता येणार नाही, धर्माच्या आधारावर श्रेष्ठत...