खरचं....माणसांचा हिशोब होतो?
(Credits: Mark Lynch for CartoonStock) "मन मोठं ठेवा कारण मेल्यावरती हिशोब तुम्ही कमवलेल्या पैशांचा नाही तर कमवलेल्या माणसांचा होतो " हा मोबाईल वर स्टेटस् वाचला आणि लगेचच मनात आले खरेच माणसांचा हिशोब होतो का..? खरंच एवढे मोठे मन कोण ठेवतं का ? होत असेल ही हिशोब माणसांचा; पण त्या हिशोबात अगोदर माणसांशी केलेला हिशोब असतो आणि तो हिशोब करताना आपले मन मोठे असते का..? मेल्यानंतर बोललेचं जाते त्याच्या पाठीमागे अमुक एक एवढ...