History vs Mahatma Gandhi :- Part 3
![]() |
| Image credit:- Sarvesh Sawakhande. |
एका शूरवीराला 'महात्मा' वाचवू का शकले नाहीत?
जज:- बहुचर्चित आरोप आहे. बचाव पक्ष, काय तुमची भूमिका यावर?
बचाव पक्ष:- आरोप पक्ष्याचा इतिहास खूपचं कच्चा दिसतोय!
जज:- ऑर्डर ,ऑर्डर ... व्यक्तिगत आरोप चालणार नाहीत. कोर्टाची सभ्यता पाळा!
बचाव पक्ष:- I regret my lord! मात्र यात खोटं काय आहे? याचं उत्तर तुम्हाला सातवी- आठवीच्या पुस्तकात मिळून जाईल. गांधी- आयर्विन चर्चासत्र 17 फेब्रुवारी ते 5 मार्च 1931 पर्यंत चाललं. तेव्हा 18 फेब्रुवारी पासूनच वेळोवेळी बापुंनी भगतसिंगांच्या फाशीविषयी आयर्विन यांच्याशी चर्चा करुन शिक्षेला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला.
आरोप पक्ष:- पण त्याचा फायदा झाला? शिक्षा थांबली? नाही! फाशी तर मिळालीच ना!
बचाव पक्ष:- शिक्षा झाली हे खरंय! मात्र हे हि लक्षात घ्या की गांधी-आयर्विन चर्चेपुर्वी तेजबहाद्दूर या कायदेपंडितांनी आयर्विन यांचेशी शिक्षा रद्द करण्याविषयी खोलवर चर्चा केली. मात्र काहीच निष्पन्न झालं नाही.तसेच प्रिव्ही कौन्सिलच्या निर्णयानुसार शिक्षेत बदल घडणार नव्हता. त्यामुळे शिक्षा स्थगित करण्याबद्दल बापूंनी आयर्विन यांचेशी चर्चा केली.
या चर्चेनंतर 19 मार्च रोजी कराचीत होणाऱ्या काँग्रेसच्या सत्रात जाहीर केलेल्या चर्चेसंबंधी आयर्विन यांचेशी चर्चा करतानाही हा मुद्दा उपस्थित केला. तसेच हर्बर्ट इमर्सन या ब्रिटिश गृहमंत्र्यांशी केलेल्या प्रदीर्घ चर्चेत शिक्षेची अंमलबजावणी कराची सत्रानंतर करणेबाबत सुचविले. पण हे सुध्दा निष्फळ ठरले. 23 मार्चच्या सकाळी बापूंनी आयर्विन यांना भगतसिंग यांना वाचवण्यासाठी वैयक्तिक पत्र लिहिले. याचा अर्थ काय होतो?
आरोप पक्ष:- काय?
बचाव पक्ष:- बापूंनी शेवट पर्यंत भगतसिंग यांना वाचवण्याचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले.
जज:- ह.. अजून काही आरोप आहे का?
आरोप पक्ष:- हो. वरील सर्व ठीक आहे, पण पाकिस्तानला 55 कोटी मिळावेत यासाठी गांधींनी उपोषण का केले?
जज:- बचाव पक्ष..
बचाव पक्ष:- खरं तर ज्या उपोषणाची गोष्ट आरोप पक्ष करत आहे, ते उपोषण बापुंनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर केलं होतं. तसंच फाळणीवेळी भारत आणि पाकिस्तान मध्ये सर्व गोष्टींचं 80:20 प्रमाणात विभाजन झालं होतं. त्यानुसार भारताने पाकिस्तानला 75 कोटी आणि पाकिस्तानने भारताला 300 कोटी देणे होते. सुरुवातीचे 20 कोटी भारताने दिल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. त्यामुळे पटेल-नेहरुंनी उर्वरित रक्कम पाकिस्तानला देण्यास नकार दिला.
आरोप पक्ष:- पण मग गांधींनी पाकिस्तानला पैसे देण्याचा हट्ट का केला?
बचाव पक्ष:- सांगतो तर!! अशा प्रकारचा करार लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या उपस्थितीत झाला. पण त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास नकार दिल्याने माउंटबॅटन यांना हा वचनभंग आणि करारभंग आहे असे वाटले. गांधींना त्यांनी तसे कळवले.गांधींना जर कराराचा भंग झाला, तर जगात देशाची बदनामी होईल असे वाटले. तसेचं शांती व सद्भावना प्रस्थापित होण्यासाठी गांधींनी 55 कोटी सरकारने द्यावे, असे सरकारला सुचवले. त्याचवेळी गांधींचे दिल्लीतील उपोषणही चालू होते. यावरुन हे उपोषण फक्त 55 कोटींसाठी नव्हते हे सिद्ध होते.
भारतीय स्वातंत्र्यलढा हा जगातील सर्वात उत्कृष्ट स्वातंत्र्यलढ्यांपैकी एक समजला जातो. या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांचे योगदान आहे, परंतू या लढ्याने खरी कलाटणी घेतली ती 1920 नंतर. म्हणजे गांधीपर्वात.
गांधींनी स्वातंत्र्यलढा योग्य प्रकारे पुढे नेला, एवढेच नाही तर पुर्णत्वास नेला. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांना प्रेरणा देणारे गांधीच. पुर्ण जगात जे सत्याग्रह व अहिंसा यासाठी जाणले जातात ते गांधी.
पण ते हिरो होते कि व्हिलन ? आपण हेच #HistoryOnTrial ( इतिहासाला ट्रायल वर ) ठेवून बघितले. शेवटी निर्णय वाचकांचा. अशाच रीतीने इतिहासाला ट्रायल वर ठेवून अशा अनेक केस स्टडी करूया History vs या सिरिझ मध्ये.
-(समाप्त)
लेखन, research, analysis:- श्रेयस सवाखंडे
शब्दांकन, संवाद, टायपिंग,front image,series idea :- सर्वेश सवाखंडे

मस्त भावांनो👍👌
उत्तर द्याहटवाKeep it up...
उत्तर द्याहटवा