पोस्ट्स

धर्म स्वातंत्र्य- पार्ट 2

इमेज
      Image by :- Sarvesh.     सेक्युलॅरिझम. विवादित शब्द. प्रत्येक पार्टी आमचंच सेक्युलॅरिझम खरं असा खुळखुळा वाजवते, हा आमचाच मक्ता आहे असं सांगत असते. या संज्ञेच्या 'व्यक्ती तितक्या व्याख्या' आहेत. पण आजपर्यंत खरं सेक्युलॅरिझम कुठल्याचं पार्टीने सांगितले नाही. तर जाणून घेऊया, संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेला सेक्युलॅरिझम काय आहे ते!      सेक्युलॅरिझमचे मराठीत अर्थपुर्ण भाषांतर करता येत नाही.  निधर्मी, अधर्मी, धर्मातीत, इहलोकवादी, अगदी धर्मनिरपेक्षता हा शब्दही या संज्ञेचा नीट अर्थ स्पष्ट करत नाही.  त्यामुळे या शब्दाच्या भाषांतराच्या भानगडीत न पडता आपण ही संकल्पना समजावून घेण्याकडे लक्ष देऊयात.      भारतात अनेक धर्म आहेत, म्हणून सेक्युलॅरिझमची आवश्यकता आहे, हा समज चुकीचा आहे. जरी भारतात हिंदू हा एकचं धर्म असता, तरीही आज सेक्युलॅरिझम ची जितकी गरज आहे, तितकीचं गरज भासली असती.   कारण सेक्युलॅरिझमचा जन्म दोन धर्मांच्या संघर्षातून होत नाही तर माणसाच्या पारलौकिक आणि ऐहिक या दोन जीवनाच्या संघर्षातून होत असतो....

धर्म स्वातंत्र्य पार्ट : 1

इमेज
                Image By:- Sarvesh Sawakhande.                    भारतीय संविधानामध्ये सध्याच्या घडीला सहा मुलभूत हक्क आहेत. त्यांपैकी  सतत चर्चेच्या झोतात असणारा हक्क म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. याबद्दल अनेक गैरसमज आहेत. तसेच धर्मस्वातंत्र्याचा हक्काच्या नावाने अनेकदा काही चुकीच्या गोष्टीही केल्या जातात ज्या संविधानाच्या मुलभूत ढाच्याच्या विरोधात आहेत. आजकालच्या राजकारणात धर्मालाही विशेष महत्व आले असताना हा धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहेतरी काय हे आपण पाहूया:-          कलम 25 ते 28 हे धार्मिक स्वातंत्र्याबद्दल भाष्य करते. तर ते खालीलप्रमाणे:- कलम 25 :- भारत राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला स्वयंइच्छेने धर्माचे पालन करण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. अपवाद:-लोकव्यवस्था, नैतिकता, परंपरेच्या अनुसार स्त्रियांचा अपमान अशी रूढी परंपरा जशी सती – प्रणाली, नरबळी, दासप्रथा, अस्पृश्यतेच्या आधारावर जातीयता बाळगता येणार नाही, धर्माच्या आधारावर श्रेष्ठत...

मुक्त ती

इमेज
Image Credits :- Sarvesh Sawakhande.                                               साक्षात प्रकट झाल्यासारखं ती माझ्या जवळ येत होती. माझ्या जास्तचं जवळ ती आली. माझ्या हातातलं पुस्तकं बाजूला ठेवत मी तिला विचारलं, "अरे तू इथे कशी काय?" ती म्हणाली,"का? मला इथे येण्यास बंदी आहे का? "तसं नाही अगं, इतका वेळ झालायं... म्हणून! " मी उत्तरलो.      (थोडावेळ थांबून) "आणि तसं पण मुली इतक्या अपरात्री घरातून बाहेर पडत नाहीत म्हणून !" मी माझ्या वाक्यात जोडलं.    "होय रे, बरोबर आहे तुझं.समाजानं चौकट आखली आहे ना, की स्त्रियांनी अपरात्री घरातून बाहेर पडू नये. का? तर  लिंगपिसाट टपून बसलेले असतात ना? आमच्या इंद्रियांवर कब्जा मिळवण्यासाठी! आणि त्यात आम्हीचं परत दोषी ठरतो!"  ती मुक्त पणे बोलत होती.     मी अस्वस्थ झालो! काय बोलावे ते समजेना. मी बाजूला ठेवलेल्या पुस्तकाकडे पाहू लागलो.       " बलात्कारी धुमाकूळ घालतायत, रोज...

History vs Mahatma Gandhi :- Part 3

इमेज
Image credit:- Sarvesh Sawakhande.   आरोप पक्ष :- My lord , भगतसिंग यांना झालेली शिक्षा गांधी रद्द करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही.   एका शूरवीराला 'महात्मा' वाचवू का शकले नाहीत?       जज :-   बहुचर्चित आरोप आहे. बचाव पक्ष, काय तुमची भूमिका यावर?    बचाव पक्ष :- आरोप पक्ष्याचा इतिहास खूपचं कच्चा दिसतोय!       जज :-  ऑर्डर ,ऑर्डर ... व्यक्तिगत आरोप चालणार नाहीत. कोर्टाची सभ्यता पाळा!    बचाव पक्ष :- I regret my lord! मात्र यात खोटं काय आहे? याचं उत्तर तुम्हाला सातवी- आठवीच्या पुस्तकात मिळून जाईल. गांधी- आयर्विन चर्चासत्र 17 फेब्रुवारी ते 5 मार्च 1931 पर्यंत चाललं. तेव्हा 18 फेब्रुवारी पासूनच वेळोवेळी बापुंनी भगतसिंगांच्या फाशीविषयी आयर्विन यांच्याशी चर्चा करुन शिक्षेला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला. आरोप पक्ष :- पण त्याचा फायदा झाला? शिक्षा थांबली? नाही! फाशी तर मिळालीच ना! बचाव पक्ष :- शिक्षा झाली हे खरंय! मात्र हे हि लक्षात घ्या की गांधी-आयर्विन चर्चेपुर्वी तेजबहाद्दूर या कायदेपंडितांनी आयर्विन या...

History vs Mahatma Gandhi :-Part 2

इमेज
                                                          image credits:- सर्वेश सवाखंडे.                           आरोप पक्ष :- आणि गांधींनी पाकिस्तानला 55 कोटी देऊ केले, मुस्लिम देशाचं, पाकिस्तानचं समर्थन केलं. अशा गांधींना गोडसेनी मारलं तर त्यात त्याचं काय चुकलं?   जज :- हं....   बचाव पक्ष :- ओ....तुम्ही हत्येचं समर्थन करुचं कसं शकता? गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न 25 जून 1934 मध्ये केला गेला पुणे येथे. त्यांच्या कारवर बाँब फेकून. त्यावेळी ना पाकिस्तानचा मुद्दा होता, ना 55 कोटींचा. 1944 मध्ये पाचगणीत जवळपास 20 जण बसमधून येऊन गांधीविरोधी घोषणा देऊ लागले. त्यांचा नेता कोण?   आरोप पक्ष: - कोण?   बचाव पक्ष: - नथुराम गोडसे ! नथुराम गांधींवर चाकू घेऊन झपटला, त्यावेळी भिलारे गुरुजी आणि मणिशंकर पुरोहितांनी त्याला पकडून ठेवले. त्याच वर्षी म्हणजे 1944 साली व...

History vs Mahatma Gandhi :-Part 1

इमेज
Image Credits: Sarvesh Sawakhande                                                   जगभरात सत्याग्रह आणि अहिंसेच्या तत्वांसाठी ओळखले जाणारे , ज्यांचेपासून प्रेरणा घेऊन जगात अनेकजणांनी स्वातंत्र्याचे लढे लढले. असे महात्मा गांधी, फाळणीसाठी जबाबदार की स्वातंत्र्याचे मेरुमणी? हिंदूविरोधी की संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे राष्ट्रपिता? ही वेळ आहे गांधींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची . History vs Mahatma Gandhi मध्ये.......   जज :- ऑर्डर...ऑर्डर...हं... आज कोर्टात बचावपक्ष कोण आहे?... गांधी?.....   आरोप पक्ष :- My lord. हो. हेचं ते गांधी जे फाळणीला जबाबदार होते. ज्यांच्या मुळे देशात दंगे झाले, अराजकता माजली, भारत पाकिस्तानचा न सुटणारा तिढा उभा राहिला.     बचाव पक्ष :- सर्वप्रथम फाळणीला एकच व्यक्ती जबाबदार नाही. सगळ्यात जास्त जबाबदार ब्रिटिश सरकार, नंतर जिन्ना, नंतर  काँग्रेसमधील नेते .गांधींनी फाळणीचं समर्थन कधीचं केलं नाही, उलट फाळणी...

साम्यवाद सिरीज : प्रस्तावना

इमेज
                                        Image by: Sarvesh Sawakhande  'साम्यवाद' हा शब्द आपण सगळ्यांनी आयुष्यात कधीतरी नक्कीच ऐकला असेल. 'साम्यवाद' म्हटलं की आठवतं 'क्रांती', 'हुकुमशाही', 'नक्षलवाद', 'ट्रेड युनियन्स', 'लाँग मार्चेस' आणि आजकाल भारताच्या एका मोठ्या भागाच्या ओठावर असणारा शब्द 'अर्बन नक्सल'. पण खरं हे 'साम्यवाद' नावाचं कोडं आहे तरी काय? चला तर मग जाणून घेऊया, आपल्या 'साम्यवाद' या ब्लॉगच्या सिरीज मधून.                         तर मग अनेकांना हा प्रश्न पडतो की, विचारधारा महत्वाची का असते ? . हे सतत 'लेफ्ट', 'राईट' , 'सेंटर' करुन मिळतं तरी काय?. तर विचारधारा किंवा विचारप्रणाली ही जीवनपद्धती असते. 'साम्यवाद' ही अशीच एक विचारधारा आहे. ज्याप्रकारे धर्म  ही जीवनपद्धती आहे, अगदी त्याचपद्धतीने साम्यवादही जीवनपद्धती आहे. साम्यवाद ही एकमेव अशी विचारपद्धती आहे, जिचा विस्तार इतका अफाट झाला आहे, आणि जी 'नैतिकते'पासून...

प्रवास:ट्रोल्सचा

इमेज
                     आ जच्या राजकारणात 'ट्रोल' हा शब्द परवलीचा झाला आहे. या शब्दाचा वापर 2014 च्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांचं 'I AM A TROLL'  हे पुस्तकही यावर प्रसिद्ध झाले आहे. आजच्या काळात या शब्दाचा वापर चिडवणे किंवा टिका करणे या अर्थाने घेतला जातो.                         ट्रोल हा शब्द 'ट्रोल डॉल' या शब्दापासून आला आहे. 1959 मध्ये Thomas Dam यांनी ट्रोल डॉल्स बनवल्या होत्या. त्यांना सुरुवातीला 'गुड लक ट्रोल्स' म्हणले जाई. केसांचे मोठे लोकरी झुपके असणाऱ्या या गुड लक ट्रोल बाहुल्या तेव्हा डेन्मार्क मध्ये प्रचंड प्रसिद्ध पावल्या. एकेकाळी 'गुड लक' साठी वापरला जाणारा शब्द आज अनेक लोकांच्या डोकेदुखीचे कारण ठरतोय.                ट्रोल्सची सुरुवात Social Media वर 2012 च्या सुमारास झाली. लोकसभा निवडणूक 2014 चा माहोल होता. वातावरण काँग्रेसविरोधी व्हायला 2011 चे जनलोक...

धर्मसत्ता की धर्म आणि सत्ता?

इमेज
     Courtesy:महाराष्ट्र टाईम्स.    आ जच्या घडीला जर आपण पाहीले, तर लुबाडणूक करणाऱ्या बाबा -बुवा-मौलवी यांचे स्तोम माजले आहे. तसेच त्यांचा राजकारणातील हस्तक्षेपही अनेक वर्षांपासून बराच वाढला आहे.आजकाल माध्यमांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय असणाऱ्या कर्नाटक निवडणूकीच्या प्रचारात अनेक प्रमुख पक्षाचे नेतेमंडळी लिंगायत मतांवर डोळा ठेवून उडपीतील सुत्तूर(suttur) व अनेक मठांच्या भेटी घेताना आपण सर्वांनी पाहिले आहेच.ही गोष्ट काही अपवाद वगळता सर्वत्र लागू आहे. जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते ,तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणण्याचे काम करते.                                                                    - देवेंद्र फडणवीस.                                               मुख्यमंत्री, महा...

वैज्ञानिक दृष्टिकोन

इमेज
                                      आ पण सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द सतत ऐकत असतो.मात्र त्याचा नेमका अर्थ आपल्याला उमगत नाही.वैज्ञानिक दृष्टिकोन हे तर्कनिष्ठ विचारांचा अवलंब करुन नैसर्गिक घटनांच्या आविष्काराचे कारण शोधण्याचे कार्य होय.निसर्ग नियमनाचे तत्व जाणून घेण्यासाठी कुतूहलाने केलेली चिकित्सा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा होय.म्हणूनच हे वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व लक्षात घेऊन भारतीय संविधानाच्या part 4A,article 51 A मध्ये 8 व्या  क्रमांकाचे कर्तव्य म्हणून शास्त्रीय दृष्टीकोन ,मानवता व अभ्यासूवृत्ती यांची वाढ करणे या कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे.                               आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांतून मात्र आपण अत्यंत   अवैज्ञानिक आहोत हेच प्रतित होते. रस्त्यावरुन चालताना अनेक ठिकाणी [विशेष करुन चौक, तिठा(का ते ठाऊक नाही)] येथे लिंबू, हळद, कुंकू, नारळ, भात,इ.. गोष्टी उतारा म...