धर्मसत्ता की धर्म आणि सत्ता?
Courtesy:महाराष्ट्र टाईम्स.
आजच्या घडीला जर आपण पाहीले, तर लुबाडणूक करणाऱ्या बाबा -बुवा-मौलवी यांचे स्तोम माजले आहे. तसेच त्यांचा राजकारणातील हस्तक्षेपही अनेक वर्षांपासून बराच वाढला आहे.आजकाल माध्यमांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय असणाऱ्या कर्नाटक निवडणूकीच्या प्रचारात अनेक प्रमुख पक्षाचे नेतेमंडळी लिंगायत मतांवर डोळा ठेवून उडपीतील सुत्तूर(suttur) व अनेक मठांच्या भेटी घेताना आपण सर्वांनी पाहिले आहेच.ही गोष्ट काही अपवाद वगळता सर्वत्र लागू आहे.
जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते ,तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणण्याचे काम करते.-देवेंद्र फडणवीस.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
वरील वाक्य तुम्ही ऐकुन असाल, तर यात नवल वाटावे असे काही नाही. ज्यांनी आपला शपथविधी (मुख्यमंत्रीपदाचा) इतक्या बाबाबुवांच्या पवित्र (?) उपस्थितीत पार पाडला असेल, त्यांची वाटचालीची दिशा हि नसती तरचं नवल!
अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे सर्व पटते हो, पण बाबा बुवांच्यात जावं लागतं !त्यांना असणारा पब्लिक सपोर्ट बघा.आम्ही शेवटी राजकारणी.आम्हाला शेवटी majority बघूनचं निर्णय घ्यावे लागतात.तुमचं बरोबर असलं तरी तुमची संख्या कमी.अहो, majority ला नाराज करुन चालत नाही .
-दिवंगत विलासराव देशमुख.
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
असे विलासराव डॉ.नरेंद्र दाभोलकरांना अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याविषयीच्या चर्चेत म्हटले होते.
Author: Hamid Dabholkar
अनेकांचा असा कयास आहे की, सत्तासंघर्ष,राजकारणातील शह-काटशह, अस्थिरता यांमुळे अनेक नेतेमंडळी बाबाबुवांच्या आहारी जातात. याला तर ज्यांना 'दुर्गामाता', 'strong woman' म्हटले गेले,ज्यांची नेहरुंबरोबरची पत्रे त्या विवेकवादी,विज्ञानवादी आहेत हे दाखवतात,त्या इंदिराजी गांधीही अपवाद नव्हत्या.त्या पंतप्रधान बनल्यावर धिरेंद्र ब्रम्हचारी यांचा सल्ला घेत असत.तसेच याबरोबरच अनेक बाबांचा त्यांच्यावर पगडा होता.Courtesy:mediawatch.info
अटल बिहारी वाजपेयी यांचे बाबांबद्दलचे सख्य अनेकांना माहिती आहे. सत्यसाईबाबा, आसाराम यांबरोबर ते खुपदा दिसले आहेत.
Courtesy:ndtv.com
Courtesy: India Today.
मग नितीशकुमार कसे मागे राहतील? बिरनाथ अघोरी यांचे ते मोठे भक्त आहेत.
Courtesy:mediawatch.info
अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबा यांची पाद्यपुजा केली होती. स्वतःचे नावही त्यांनी सत्यसाईबाबांच्या सांगण्यावरुन अशोकराव केले. मात्र नंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद आदर्श घोटाळ्यात गेले. त्यावेळी राष्ट्रवादीचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही (जे सुद्धा त्यांचे भक्त आहेत) उपस्थित होते.
Courtesy:Google search
आपले प्रधानसेवकही मग याला अपवाद कसे ? त्यांच्यावर तर आसाराम बापुंचा आशिर्वाद आहे. गुरमीत राम रहीम व आसाराम यांचे त्यांच्याशी सख्य आहे.
याला अपवाद म्हणजे शरद पवार. त्यांनी एकाही बुवा बाबाला आसपास फिरकूही दिलं नाही.
Courtesy:Google search
आणि डावे पक्ष. ते त्याला अपवाद आहेत.
Courtesy: twitter {cpim}
या सर्व उदाहरणावरुन एक प्रश्न पडतो की,या सर्वाचे कारण काय असावे? .यावर थोडीफार खलबतं केली तर कळतं की,माणसाच्या दोन भावना असतात,एक शारिरिक ,एक मानसिक.शारिरीकदृष्ट्या सक्षम असणारा व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असेलचं असं नाही.याचाचं फायदा हे बाबा-बुवा,मुल्ला-मौलवी घेतात. याला कारणीभूत असते ती मानसिक भिती.
भिती कशाची? तर भिती अस्थिरतेची,मालमत्तेची,भवितव्याची.ही भिती घालवण्यासाठी हे लोक आधार शोधत असतात.तो आधार हे बाबा-बुवा बनतात.आपल्या तोट्याची,चिंतेची बाह्य कारणे मिळाली की या आधार घेणाऱ्यांही बरे वाटते.बाबा,मौलवीही हेच करतात(सगळेच असं करतात असा आमचा दावा मुळीच नाही) .राजकीय पाठबळ,अंधभक्तांचे तांडे,पोलीस अधिकाऱ्यांची भक्ती,त्यात भरीस भर म्हणजे ना कोणता कर ना इतर काही. पोलिस सोबत, राजकारणी सोबत,त्यामुळे यांचे गोरखधंदे, दंगे घडवणे चालू राहते. स्वदेशीच्या नावावर हे स्वतःचे भयंकर मोठे साम्राज्य उभे करतात.या उद्योगात भक्तांना सामील करतात.
तसेच अनेक महाभाग मी देवाचा अवतार आहे,असे सांगतात.मग अंधभक्तगण आपसूकचं वाढत जातो.या आयत्या वोटबँकेवर राजकारणी टपून असतात.मग याला धर्मरक्षण,दानाचा मुलामा चढवला की लोक आणखी भुलतात व दोघांचेही फावते.यात राजकारण्यांची फायद्यासाठी investment असते आणि बाबाबुवांची बक्कळ कमाई.हे सगळं लोकशाहीला मारक आहे.या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. हे कळत असूनही ही बाबा-नेता युती कधीचं तुटत नाही.
हे राजकारणी,सेलेब्रिटी यांच्याकडे जातात या गोष्टीने आकर्षित होऊन सामान्य माणूसही याकडे खेचला जातो.त्यात त्याचे खिसे मोकळे होतात आणि भोंदू बुवांच्या तुंबड्या मात्र गच्च भरतात.आणखीन एक हानी म्हणजे यामुळे सामान्यजण मानसिक गुलामगिरीकडे ओढला जातो.यांची साम्राज्य शाबूत राहून फोफावतात आणि सामान्यजण गुलामगिरीच्या बेड्यात आणखीनच जखडला जातो. या सगळ्यांबाबत विचार तर केलाचं पाहिजे.
पुर्वी ते अप्रत्यक्ष राजकारण करायचे. आता मात्र ते मंत्रिमंडळात (योगी आदित्यनाथ ,साक्षी महाराज, उमा भारती, कॉम्प्युटर बाबा इ.) ते सहभागी आहेत. जातीय विद्वेष,धार्मिक दंगे, भडकाऊ भाषणे हे यांचे वोट मिळवण्याचे फंडे आहेत. आसाराम, राम रहिम पकडले गेलेत, मात्र त्यांची साम्राज्ये, वेडे brainwashed भक्त , अर्थकारण ,नेत्यांवरील प्रभाव कायम आहे. विज्ञानाच्या मदतीने प्रगतीकडे जायचे; वर्तमान व भविष्याचे आडाखे बांधायचे, की मध्ययुगात इतिहास कसा चांगला होता हे चघळून बघत बसून भूतकाळात रमायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.
शेवटी बशीर बद्र यांचा शेर.
"लोग टूट जाते हैं एक घर बनाने मैं.....
तुम तरस नहीं खाते बस्तींया जलाने मैं..."
-बशीर बद्र.
©-सर्वेश सवाखंडे.©-श्रेयस सवाखंडे.
Disclaimer: सदर लेखाचा कोणाच्याही धार्मिक, राजकीय, सामाजिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वास्तव समोर आणण्यासाठी सदर लेखात अनेक राजकीय , धार्मिक नावे सबळ पुराव्यानिशी घेतली आहेत. तरी आक्षेप असल्यास troll अथवा शिवीगाळ न करता comments मध्ये आपले मत मांडावे.
टीप: सदर लेखातील मजकूर copy paste करुन वापरणे © copyright कायद्यान्वये गुन्हा आहे. कोणीही सदर लेख copy paste अथवा बदल करुन publish करु नये.
Very nice guys✌️
उत्तर द्याहटवा