पोस्ट्स

VK, MPL & UNICORN

इमेज
  Image: Sarvesh               काही दिवसांपूर्वी मोठी बातमी समोर आली. मोबाईल प्रीमियर लीग या विराट कोहलीने गुंतवणूक केलेल्या मोबाईल गेमिंग प्लॅटफॉर्मने ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर  (६.९ अब्ज भारतीय रुपये) इतका निधी उभा केला आणि युनिकॉर्न कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवण्याच्या जवळ आगेकूच केली.               उद्योगजगतात १ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त मूल्य असणाऱ्या खासगी स्टार्टअप कंपन्यांना 'युनिकॉर्न' कंपनी असं म्हणलं जातं. ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा निधी उभा केल्यावर एम पी एल चे एकत्रित मूल्य ९४५ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढं झालं आहे.                एम पी एल ने हा निधी 'सिरीज डी राऊंड फंडिंग' मधून 'कंपोझिट कॅपिटल आणि मुर स्ट्रॅटेजीक वेंचर्स ' आणि 'बेस पार्टनर्स', 'आर टी पी ग्लोबल', 'एस आय जी', 'गो वेंचर्स', 'टेल्स्ट्रा वेंचर्स', 'फाऊंडर्स सर्कल' आणि 'प्ले वेंचर्स' च्या सहभागातून उभा केला आहे. MPL ad / Credits: (wealth mann)            ...

महात्मा गांधी आणि हिंदुत्ववाद

इमेज
  (Image: Sarvesh) (credits: Mahatma Gandhi- wikipedia, V.D. Savarkar- counter view)                       आज ३० जानेवारी. महात्मा गांधींचा पुण्यदिन. महात्मा गांधींची हत्या आणि हत्या करणाऱ्या व्यक्तींच्या विचारसरणी यांबद्दल खूप गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. महात्मा गांधींच्या खुनानंतर  महात्मा गांधी यांच्या खुनाचे समर्थन करणाऱ्या अनेक पुस्तकांत महात्मा गांधींची प्रतिमा धर्मद्रोही अशी केली आहे. गांधींच्या हत्येच्या कारणांपैकी खूप मोठे कारण धर्मद्रोह आहे असा आरोप केला जातो. त्यामुळे दोन्ही बाजू समजावून घेणे गरजेचे आहे. * हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्म एकच आहे का?                  १९२१ किंवा १९२२ मध्ये अंदमानात वि. दा. सावरकर लिखित 'इसेन्शिअल्स ऑफ हिंदुत्व' या पुस्तकामध्ये असं नमूद केलेले आहे की "हिंदू धर्म हा हिंदुत्वाचा एक लहानसा भाग आहे. हिंदुत्ववाद हा हिंदू कुळातील सर्व विचार आणि क्रियाकर्म मिळून बनला आहे. हिंदू धर्म हा फक्त आध्यात्मिक किंवा धार्मिक मतप्रवाहावर आधारित सिद्धांत आह...

खरचं....माणसांचा हिशोब होतो?

इमेज
(Credits: Mark Lynch for CartoonStock)                                 "मन मोठं ठेवा कारण                                  मेल्यावरती हिशोब                              तुम्ही कमवलेल्या पैशांचा नाही                           तर कमवलेल्या माणसांचा होतो "                        हा मोबाईल वर स्टेटस् वाचला आणि लगेचच मनात आले खरेच माणसांचा हिशोब होतो का..? खरंच एवढे मोठे मन कोण ठेवतं का ? होत असेल ही हिशोब माणसांचा; पण त्या हिशोबात अगोदर माणसांशी केलेला हिशोब असतो आणि तो हिशोब करताना आपले मन मोठे असते का..?                     मेल्यानंतर बोललेचं जाते त्याच्या पाठीमागे अमुक एक एवढ...

Patriotism & Nationalism

इमेज
  इमेज: सर्वेश (credits: Adolf Hitler: videoink, Rabindranath Tagore: Wikipedia)                                 मित्रांनो आज प्रजासत्ताक दिन ... आज आपल्यापैकी काही लोकांची 'देशभक्ती' काही काळासाठी जागी होईल.  पण मुळात देशभक्ती म्हणजे काय? देशभक्ती ही संकल्पना भारतीय आहे का? काय केलं की देशभक्त होता येतं? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडतात ना? चला तर मग जाणून घेऊया...                         इंग्रजी मध्ये 'देशभक्ती' या अर्थाने सहसा दोन शब्द वापरले जातात. 'Patriotism' आणि 'Nationalism' . दोन्ही शब्दांचा अर्थ काहीसा वेगळा आहे. 'Patriotism' म्हणजे 'राष्ट्राविषयी प्रेम' आणि 'Nationalism' म्हणजे 'राष्ट्राशी प्रामाणिक असणे किंवा राष्ट्राविषयी त्यागवृत्ती असणे' . 'Patriotism' ही संकल्पना 'Nationalism' या संकल्पनेपेक्षा 2000 वर्ष जुनी आहे!! आणि 'Nationalism' ही संकल्पना अगदी अलीकडची म्हणजे 19 व्या शतकातील आहे. (Credits: The Nib)   ...

बॅन बॅन

इमेज
  (इमेज: सर्वेश) (Credits: Taandav: IMDb, Agrima Joshua: ndtv, Munawar Faruqui: Bar and Bench, Tanishq ad: she the people, Padmavat: IMDb, My Name Is Khan: IMDb)                  हल्ली भावना दुखावल्या गेल्यामुळे गोष्टी 'बॅन' करायची जणू फॅशनच आली आहे. कुठेतरी एखाद्या चित्रपट, वेब सिरीज, पुस्तक, कलाकृती, स्टँड-अप कॉमेडी, सटायर, जाहिराती मुळे धर्माच्या, राजकीय नेत्यांच्या, ऐतिहासिक व्यक्तींच्या, जातींच्या, परंपरांच्या बद्दल काही टिप्पणी किंवा काही लोकांना प्रतिकूल अशा गोष्टी आढळल्या (किंवा आता आढळल्या नाही तरीही) लोकांच्या भावना दुखावल्या जातात. आजकाल तर याची तीव्रता भयावह वाटावी इतकी वाढली आहे.          नजीकच्या काळात अशा घटना जणू रोजच्याच झाल्यात. उदा.तांडव या वेब सिरीज वर बंदी घालण्याची भाजपा नेते राम कदम यांची मागणी, इंदोर मधील भाजपा नेत्या मालिनी गौड यांचा मुलगा एकलव्य गौड याने शो मध्ये घुसून स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुकी, नवीन यादव, प्रखर व्यास, प्रियम व्यास, एडविन अँथनी, सदाकत खान यांना मारहाण करून पोल...

आयुष्य

इमेज
इमेज :सर्वेश                              काही लोक भेटून बदलून जातात आणि काही लोकांशी भेटून आयुष्य बदलुन जातं...  काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि खूप साऱ्या आठवणी साठवून जातात. काही लोक आयुष्य घडवतात. आयुष्याची वाट दाखवतात. चांगले विचार देऊन जातात.          समाजातील बऱ्याच गोष्टीचं भान आपल्याला करून देतात. आयुष्य म्हणजे काय? ते कसं जगायचं ?आयुष्यात नेमकं करायचं तरी काय ? या गोष्टी ते सांगून जातात. आणि आपल्याला त्याची किंमत कळत नाही. वेळ निघून जाते आणि त्या गोष्टीची आठवण करून देते. आणि सरतशेवटी आयुष्याची बेरीज शून्य लागते.         त्याचप्रमाणे खडतर लोकही असतात आपल्या आयुष्यात. परंतु ती खूप निर्मळ मनाची असतात. नेहमी आपलाच विचार करणारी, ती आपल्याला समजत नाहीत. काही येतात अन् खूप सार दुःखच देऊन जातात. काही रक्ताची असतात पण खूप सारं दुःखच देतात तर काही परके आनंद देतात. तर काही अनुभव देऊन जातात.           या सर्व गोष्टींंचं ओझं हलकं करण्...

शेतकरी जात्यात ,आपण सुपात, अदानी- अंबानी तुपात

इमेज
  शेतकऱ्यांनी तीन कृषी बिलांविरोधात दिल्लीकडे कूच केली. (Credits: NEWSCLICK)                    गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब-हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विषयक कायद्याला विरोध करत आहेत. दोन अडीच महिने झाले शेतकरी आम्हाला हे नवे कायदे नको आहेत असे ओरडून सांगत होते. परंतु शेतकऱ्यांचा हा आवाज ना सरकारपर्यंत पोहोचत होता, ना सरकार पुरस्कृत मीडिया पर्यंत पोहोचत होता. ज्यावेळी या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली तेंव्हा मात्र सरकारच्या आणि गोदी मीडियाच्या कानठळ्या बसायला लागल्या आणि सरकार खडबडून जागे झाले. न्यूज चॅनेल मधून गेले पाच दिवस झाले आपल्याला शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी बातम्या दिसू लागल्या खऱ्या परंतु हे आंदोलन काही काल परवा सुरू झालेले नाही. गेले शंभर दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे.                         5 जून 2020 रोजी मोदी सरकारने कृषी बाजार सुधाराचे अध्यादेश काढले होते. हे अध्यादेश काढताना लोकसभेत कुठलीही चर्चा न...

वाळू माफिया भाग २

इमेज
   इमेज: सर्वेश           अवैध वाळू उत्खननाविरोधात अनेक व्यक्ती महत्वपूर्ण काम करत आहेत. मात्र याची सुरुवात केलीये सुमैरा अब्दुलाली यांनी. ज्यावेळी त्यांनी ही गोष्ट अनेक ठिकाणी पाहिली त्यावेळी त्यांना या लोकांना रंगेहात पकडलं तरचं FIR नोंदवून घेऊ असं पोलिसांनी सांगितलं.          महाड येथे चाललेला अवैध वाळू उपसा जेव्हा त्यांनी पत्रकारांसोबत जाऊन शूट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. ही घटना २००४ ची. त्यांच्या प्रयत्नाने 'UNESCO' ने २०१२ नंतर वाळू उपसा ही गोष्ट पर्यावरणाच्या विरोधी आहे हे जाहीर केलं.          सुमैरा आणि इतर पर्यावरण कार्यकर्त्यांनी खुप मोठ्या प्रमाणावर 'Don't Bury The Issue Of Sand Mining' ही मोहीम राबवली. त्यातून 'डेनिस डेलेस्ट्रॅक' या फ्रेंच डायरेक्टर ने 'सँड वॉर्स' ही फिल्म बनवली. राष्ट्रीय हरित लवादाने त्यानंतर अवैध वाळू उत्खनना विरोधातील कायदे अत्यंत कठोर केले.           अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सुमैरा अब्दुलाली, पर्यावरण कार्...

वाळू माफिया भाग १

इमेज
  इमेज: सर्वेश              वाळू. ही सामान्य वाटणारी गोष्ट सगळीकडे पसरलेली आहे. मोठमोठ्या बिल्डिंग्जच्या काँक्रीटपासून ते स्मार्टफोनच्या काचेपर्यंत वाळू सगळीकडे पसरलेली आहे. वाळूपासून काच बनली आणि काचेने वैज्ञानिक क्रांती घडवली. टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपने विज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे. वाळू मानवाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलाय.      त्यामुळे वाळूला महाप्रचंड मागणी आहे. जगात दरवर्षी सरासरी ४० अब्ज टन वाळू वापरली जाते. ही मागणी दरवर्षी वाढतचं आहे. ज्याने याला दरवर्षी ७० अब्ज अमेरिकी डॉलर्स कमवणारी इंडस्ट्री बनवली आहे. जगातील अनेक देश स्वतःची भौगोलिक सीमा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाळू आयात करत आहेत. ऑस्ट्रेलिया आखाती देशांना प्रचंड मोठ्या जहाजांतून वाळू निर्यात करत आहे. वाळूच्या वापरामध्ये चीनपाठोपाठ भारताचा दुसरा क्रमांक लागतो.          बांधकाम करण्यासाठी विशेषतः नदीतून मिळणारी वाळू  वापरली जाते. तिच्या अभावी समुद्रातील वाळू सुद्धा वापरली जाते. यासाठी वाळवंटातील वाळू वापरता येत...