History vs Mahatma Gandhi :-Part 1

Image Credits: Sarvesh Sawakhande
                                                  जगभरात सत्याग्रह आणि अहिंसेच्या तत्वांसाठी ओळखले जाणारे , ज्यांचेपासून
प्रेरणा घेऊन जगात अनेकजणांनी स्वातंत्र्याचे लढे लढले. असे महात्मा गांधी, फाळणीसाठी जबाबदार की स्वातंत्र्याचे मेरुमणी? हिंदूविरोधी की संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे राष्ट्रपिता? ही वेळ आहे गांधींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची . History vs Mahatma Gandhi मध्ये.......
  जज:- ऑर्डर...ऑर्डर...हं... आज कोर्टात बचावपक्ष कोण आहे?... गांधी?.....
  आरोप पक्ष:- My lord. हो. हेचं ते गांधी जे फाळणीला जबाबदार होते. ज्यांच्या मुळे देशात दंगे झाले, अराजकता माजली, भारत पाकिस्तानचा न सुटणारा तिढा उभा राहिला.
   बचाव पक्ष:- सर्वप्रथम फाळणीला एकच व्यक्ती जबाबदार नाही. सगळ्यात जास्त जबाबदार ब्रिटिश सरकार, नंतर जिन्ना, नंतर  काँग्रेसमधील नेते .गांधींनी फाळणीचं समर्थन कधीचं केलं नाही, उलट फाळणी अटळ आहे हे कळल्यानंतर झालेले दंगे शमविण्यासाठी पंजाब, काश्मीर आणि बंगालचे दौरे करुन समाजात शांतता प्रस्थापित करण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले. तसेच गांधींनी फाळणीसाठी काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या तर्कांना 'अनैतिक तर्क' म्हटले.
   आरोप पक्ष:- बरं...तर याचा अर्थ तुम्ही हे मान्यचं करणार नाही तर.... पण पाकिस्तानातून आलेल्या व भारतातील हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार झाले ,त्याचं काय? त्यावर काय बोलाल?
जज:- ह... त्याकाळी दंगे झालेत हे खरंय ! गांधींनी काय केले यावर?
बचाव पक्ष:- पहिल्यांदा एक महत्त्वाचं सांगतो, महात्मा गांधी हिंदूविरोधी नव्हते. ते नेहमी मी 'सनातनी हिंदू' आहे असं अभिमानानं सांगायचे.
आरोपी पक्ष: होते ना, मग सांगा तरी काय भूमिका घेतली तुमच्या 'सनातनी हिंदूने?'
जज:- ऑर्डर .. ऑर्डर.. Please mind your language. & don't influence when he is talking. Let him talk.
आरोपी पक्ष:- Sorry your honour.
जज: Please complete your statement.
बचाव पक्ष:- Thank you. आरोपी पक्षाने जर काही विचारले तर बोलून द्यावे. कोलकात्यात 1946 साली उसळलेल्या दंगलीत हिंदूंची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली, मोठी दंगल उसळली. त्याविरोधात कोण उपोषणाला बसले?
आरोप पक्ष:- कोण?
बचाव पक्ष:- महात्मा गांधी. याचा फार मोठा प्रभाव पडून 12 महिने उसळलेला तणाव शांत झाला. तेच काही पंजाबात झालं. दिल्लीला परत आल्यावर बापुंंनी विस्थापितांच्या स्थिरीकरणासाठी प्रयत्न केले. "ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको संमती दे भगवान।" म्हणत मानवतेचा धर्म शिकवणारे गांधीजी धर्मधर्मात भेदभाव कसा करतील?
आरोप पक्ष:- ह.. ठिक आहे. पण गांधींनी पटेलांना दूर करून नेहरूंना पंतप्रधान पदासाठी जवळ केलं, हे ही आता नाकाराल काय?
जज:- ह..  बहुचर्चित मुद्दा. बचाव पक्ष काय मत यावर?
बचाव पक्ष:- हा आरोप करण्यापूर्वी माझ्या आरोप पक्षाच्या वकील मित्रांनी जरा, थोडासाचं इतिहास वाचला असता तर बरं झालं असतं.
जज:- मुद्द्याचं बोला.
बचाव पक्ष:- माफी असावी. भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा पटेलांचं वय किती होतं?
आरोप पक्ष: किती?
बचाव पक्ष:- 72 वर्षे. अत्यंत अशक्त झाले होते ते. त्यांना हृदयविकाराचे झटके येऊन गेले होते. 1948 मध्ये त्यांनी दिल्ली सोडून जाताना म्हटलं होतं, "मी आता इथे नसेन, माझे जवाहरशी कितीही मतभेद असले तरीही त्याच्या बरोबर राहा. माझा त्याच्या पंतप्रधानपदाला पाठींबा आहे". नेहरू सरदारांपेक्षा 15 वर्षांनी लहान आणि सशक्त होते. त्यामुळे बापूंनी नेहरूंच्या नावाला अधिक पसंती दिली. त्यापुढे तर 15 डिसेंबर 1950 रोजी सरदारांचे heart attack ने निधन झाले, 1951 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी. थोड्याश्या इतिहासाच्या वाचनाने हा प्रश्न निकाली निघाला असता.
जज:- ह..
                                                                                                                                               -(क्रमशः)
                                                                           लेखन, research and analysis:- श्रेयस सवाखंडे
         शब्दांकन, top image, series concept व संवाद:-  सर्वेश सवाखंडे
                     

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Trending

आयुष्य

वैज्ञानिक दृष्टिकोन

मुक्त ती