साम्यवाद सिरीज : प्रस्तावना
Image by: Sarvesh Sawakhande
'साम्यवाद' हा शब्द आपण सगळ्यांनी आयुष्यात कधीतरी नक्कीच ऐकला असेल. 'साम्यवाद' म्हटलं की आठवतं 'क्रांती', 'हुकुमशाही', 'नक्षलवाद', 'ट्रेड युनियन्स', 'लाँग मार्चेस' आणि आजकाल भारताच्या एका मोठ्या भागाच्या ओठावर असणारा शब्द 'अर्बन नक्सल'. पण खरं हे 'साम्यवाद' नावाचं कोडं आहे तरी काय? चला तर मग जाणून घेऊया, आपल्या 'साम्यवाद' या ब्लॉगच्या सिरीज मधून.
तर मग अनेकांना हा प्रश्न पडतो की, विचारधारा महत्वाची का असते ? . हे सतत 'लेफ्ट', 'राईट' , 'सेंटर' करुन मिळतं तरी काय?. तर विचारधारा किंवा विचारप्रणाली ही जीवनपद्धती असते. 'साम्यवाद' ही अशीच एक विचारधारा आहे. ज्याप्रकारे धर्म ही जीवनपद्धती आहे, अगदी त्याचपद्धतीने साम्यवादही जीवनपद्धती आहे. साम्यवाद ही एकमेव अशी विचारपद्धती आहे, जिचा विस्तार इतका अफाट झाला आहे, आणि जी 'नैतिकते'पासून 'भौतिकते'पर्यंत भाष्य करते.
साम्यवादाचे अनेक पैलू आहेत. अगदी साम्यवादाचे गॉडफादर असणाऱ्या मार्क-एंगल्स पासून लेनिन, स्टॅलिन, ट्रोटस्की, टिटो पासून ते अगदी माओ-त्से-तुंगपर्यंत. तसेच तिथून क्रुश्चेव्ह आणि त्यानंतर ब्रेझ्नेव्ह ने सुधारलेले भारत-रशिया संबंध, रशियाची आजतागायत सुरु असणारी लष्करी मदत (आता चर्चेत असणारे S-400 हे त्याचेच उदाहरण आहे.) तसेच रशिया हा भारताचा स्वातंत्र्यकाळापासून खुप चांगला मित्र राहीला आहे.
'साम्यवाद' हा 'आहे रे-नाही रे', किंवा उद्योजक-कामगार संघर्ष यांच्यापुरताचं मर्यादित नाही. तो शोषणाविरुद्ध उठवलेला आवाज आहे. याचं साम्यवादाने बोल्शेव्हिक क्रांतीपासून अनेक देशांत क्रांत्या करुन त्या त्या देशामधील साम्राज्यवादी, भांडवलशाही किंवा राजेशाहीला उलथवून लावलं. साम्यवाद हा धर्म व आध्यात्मिकतेवर विश्वास न ठेवणारा आणि भौतिकवाद , कार्यकारणभावावर विश्वास ठेवणारा विचार आहे.
आजकाल अनेकजणांना साम्यवाद संपला असं वाटतं. बहुतेक तटस्थपणे लिहीणाऱ्या लेखकांचा हाच अंदाज होता. 1980-90 च्या दशकात रशियात काय चीनमध्येही साम्यवाद नावालाही उरणार नाही असं प्रदीप बोस यांनी म्हटलं होतं. पण त्यांच्या 'कम्युनिझम अँड कम्युनिस्ट सिस्टीम्स' या पुस्तकात त्यांनी "हे माझ्या काही चुकलेल्या अंदाजांपैकी एक आहेत" असं म्हटलं आहे.
साम्यवाद जाणून घेणं ही खुप इंटरेस्टींग प्रोसेस आहे. याच्यावर ब्लॉग सिरीज लिहीणं खरंच खुप मजेशीर आणि जिज्ञासा वाढवणारं आहे.
-लेखक: सर्वेश सवाखंडे©
-एडीटर: श्रेयस सवाखंडे©
Important information.. thanks to progressive brothers
उत्तर द्याहटवाThank you Sanket from both of us. Your appreciation will inspire us.
हटवाचांगली सुरुवात
उत्तर द्याहटवाThanks.
हटवाGood information
उत्तर द्याहटवाGood work bro 😎
उत्तर द्याहटवा