पोस्ट्स

प्रवास:ट्रोल्सचा

इमेज
                     आ जच्या राजकारणात 'ट्रोल' हा शब्द परवलीचा झाला आहे. या शब्दाचा वापर 2014 च्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांचं 'I AM A TROLL'  हे पुस्तकही यावर प्रसिद्ध झाले आहे. आजच्या काळात या शब्दाचा वापर चिडवणे किंवा टिका करणे या अर्थाने घेतला जातो.                         ट्रोल हा शब्द 'ट्रोल डॉल' या शब्दापासून आला आहे. 1959 मध्ये Thomas Dam यांनी ट्रोल डॉल्स बनवल्या होत्या. त्यांना सुरुवातीला 'गुड लक ट्रोल्स' म्हणले जाई. केसांचे मोठे लोकरी झुपके असणाऱ्या या गुड लक ट्रोल बाहुल्या तेव्हा डेन्मार्क मध्ये प्रचंड प्रसिद्ध पावल्या. एकेकाळी 'गुड लक' साठी वापरला जाणारा शब्द आज अनेक लोकांच्या डोकेदुखीचे कारण ठरतोय.                ट्रोल्सची सुरुवात Social Media वर 2012 च्या सुमारास झाली. लोकसभा निवडणूक 2014 चा माहोल होता. वातावरण काँग्रेसविरोधी व्हायला 2011 चे जनलोक...

धर्मसत्ता की धर्म आणि सत्ता?

इमेज
     Courtesy:महाराष्ट्र टाईम्स.    आ जच्या घडीला जर आपण पाहीले, तर लुबाडणूक करणाऱ्या बाबा -बुवा-मौलवी यांचे स्तोम माजले आहे. तसेच त्यांचा राजकारणातील हस्तक्षेपही अनेक वर्षांपासून बराच वाढला आहे.आजकाल माध्यमांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय असणाऱ्या कर्नाटक निवडणूकीच्या प्रचारात अनेक प्रमुख पक्षाचे नेतेमंडळी लिंगायत मतांवर डोळा ठेवून उडपीतील सुत्तूर(suttur) व अनेक मठांच्या भेटी घेताना आपण सर्वांनी पाहिले आहेच.ही गोष्ट काही अपवाद वगळता सर्वत्र लागू आहे. जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते ,तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणण्याचे काम करते.                                                                    - देवेंद्र फडणवीस.                                               मुख्यमंत्री, महा...

वैज्ञानिक दृष्टिकोन

इमेज
                                      आ पण सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द सतत ऐकत असतो.मात्र त्याचा नेमका अर्थ आपल्याला उमगत नाही.वैज्ञानिक दृष्टिकोन हे तर्कनिष्ठ विचारांचा अवलंब करुन नैसर्गिक घटनांच्या आविष्काराचे कारण शोधण्याचे कार्य होय.निसर्ग नियमनाचे तत्व जाणून घेण्यासाठी कुतूहलाने केलेली चिकित्सा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा होय.म्हणूनच हे वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व लक्षात घेऊन भारतीय संविधानाच्या part 4A,article 51 A मध्ये 8 व्या  क्रमांकाचे कर्तव्य म्हणून शास्त्रीय दृष्टीकोन ,मानवता व अभ्यासूवृत्ती यांची वाढ करणे या कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे.                               आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांतून मात्र आपण अत्यंत   अवैज्ञानिक आहोत हेच प्रतित होते. रस्त्यावरुन चालताना अनेक ठिकाणी [विशेष करुन चौक, तिठा(का ते ठाऊक नाही)] येथे लिंबू, हळद, कुंकू, नारळ, भात,इ.. गोष्टी उतारा म...